अभिनेत्रींसह बोल्ड सीन देणाऱ्या धर्मेंद्र यांनी मुलींना ठेवलं होतं बंधनात?; सिव्हलेस टॉप घालण्यासही होती मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 12:15 PM2021-11-03T12:15:00+5:302021-11-03T12:15:00+5:30

Esha deol: सध्या सोशल मीडियावर इशाची एक जुना मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये ती आणि हेमा मालिनी या दोघी सिमी ग्रेवाल यांच्या चॅट शोमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे.

when esha deol revealed dharmendra banned her wearing sleeveless tops in home | अभिनेत्रींसह बोल्ड सीन देणाऱ्या धर्मेंद्र यांनी मुलींना ठेवलं होतं बंधनात?; सिव्हलेस टॉप घालण्यासही होती मनाई

अभिनेत्रींसह बोल्ड सीन देणाऱ्या धर्मेंद्र यांनी मुलींना ठेवलं होतं बंधनात?; सिव्हलेस टॉप घालण्यासही होती मनाई

googlenewsNext

बॉलिवूडचे 'हीमॅन' अशी ओळख मिळवणारे अभिनेता म्हणजे धर्मेंद्र(Dharmendra).  आजवरच्या कारकिर्दीमध्ये धर्मेंद्र यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे आजही त्यांची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. धर्मेंद्र यांच्याप्रमाणेच आज त्यांची मुलं आणि पत्नीदेखील (Hema Malini) कलाविश्वात सक्रीय असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांच्या मुलांनी त्यांच्या अभिनयशैलीच्या जोरावर कलाविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. यात त्यांची लेक इशा देओलदेखील  (Esha Deol) मागे नाही. परंतु, इशाने कलाविश्वात येणं धर्मेंद्र यांना मान्य नव्हतं. इतकंच नाही तर त्यांच्या मुलींना त्यांनी घरात शॉर्ट ड्रेस किंवा सिव्हलेस ड्रेस घालण्यासही मनाई केली होती. याविषयी खुद्ध इशानेच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

सध्या सोशल मीडियावर इशाची एक जुना मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये ती आणि हेमा मालिनी या दोघी सिमी ग्रेवाल यांच्या चॅट शोमध्ये असल्याचं दिसून येत आहे. त्यावेळी इशा साधारणपणे १७ वर्षांची असावी. यावेळी सिमीने इशाला तिच्या बॉलिवूड डेब्यूविषयी प्रश्न विचारला होता. त्यावेळी इशाने अनके गोष्टींचा खुलासा केला होता.

"कलाविश्वात येण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. पण हे सगळं माझ्या वडिलांवर अवलंबून आहे", असं इशा म्हणाली. इशाच्या या वाक्यामागील कारण हेमा मालिनी यांनी सांगितलं. "एकदा मी स्वत: धर्मेंद्र यांच्याकडे इशाच्या बॉलिवूड डेब्यूचा विषय काढला होता. परंतु, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. इशाचा जन्म झाला त्याचवेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की, मुलींना डान्स शिकू दे. परंतु, त्यांना बॉलिवूडमध्ये काम करता येणार नाही", असं हेमा मालिनी म्हणाल्या.

"बॉलिवूडचा विषय काढल्यावर ते लगेच चिडतात अशातला प्रकार नाही. ते माझ्यावर आणि आहानावर प्रचंड प्रेम करतात. त्यांची विचारसरणी थोडीशी पंजाबी स्टाइलची आहे. त्यामुळे मुलींनी घरी रहावं. आम्हाला घरातून एकटं बाहेर पडायचीही परवानगी नाही. परंतु, आईमुळे स्पोर्ट्स किंवा अन्य गोष्टींसाठी बाहेर पडायची संधी मिळते. इतकंच नाही तर त्यांना आम्ही सिव्हलेस टॉप किंवा शॉर्ट्स पॅण्ट्स परिधान केल्या तरीदेखील आवडत नाही", असं इशा म्हणाली होती.

दरम्यान, इशाने बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. परंतु, लग्नानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. इशा सध्या तिचा अधिकाधिक वेळ कुटुंब आणि मुलांसाठी देत असल्याचं पाहायला मिळतं.

Web Title: when esha deol revealed dharmendra banned her wearing sleeveless tops in home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.