तीन खंबीर महिलांच्या आयुष्याभोवती फिरणारा लेडीज स्पेशल हा एक असा कार्यक्रम आहे की ज्याच्याबरोबर प्रेक्षक स्वतःला जोडू शकतात. गिरीजा ओक ही मराठीमधील लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. सध्या ती सोनी एंटरटेनमेंटवरील लेडीज स्पेशल कार्यक्रमात मेघना निकडेची भूमिका साकारत आहे.
गिरीजाला गिफ्ट्स खूप आवडतात म्हणजे लोक तिला देतात ते आणि ती स्वतःला देते तेसुद्धा. आपल्या प्रेमाविषयी सांगताना ती एक विनोदी किस्सा सांगते, ''आम्ही एकदा असे रस्त्यावरून चालत होतो आणि मी माझ्या नवऱ्याकडे तक्रार करत होते की तो मला कधी काही गिफ्ट्स देतच नाही. अचानक मला माझ्या नवऱ्याने मला विचारलं की तुला काय पाहिजे. मी डोळ्याची पापणीसुद्धा न लावता जवळच्या घड्याळाच्या दुकानात शिरले आणि माझ्यासाठी एक खूपच महाग घड्याळ निवडलं. ते त्याला एवढं भारी पडलं की त्यानंतर माझ्या नवऱ्याला मला काय हवं आहे असं विचारण्याचं धाडस झालं नाही. त्यानंतर त्यानी मला कोणतीही गोष्ट देणं बंद केलं.'' ती पुढे म्हणाली, ''मी तारे जमीं पर चित्रपटाचं शूटिंग करत असतानाची गोष्ट आहे, जेव्हा मला कोणी व्हॅलेंटाईन डेच्या प्लॅनबद्दल विचारत असे तेव्हा मी सांगत असे की मी अमीर खानबरोबर हा दिवस घालवणार आहे. तेव्हा सगळ्यांना जे आश्चर्य वाटत असे ते मी कधीच विसरू शकणार नाही.''