Join us

रणबीरच्या सिनेमात गोविंदाला मिळाली हीन दर्जाची वागणूक; ऐनवेळी सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 9:01 AM

Govinda: या सिनेमाच्या सेटवर गोविंदाला ज्युनिअर आर्टिस्टपेक्षा जास्त वाईट वागणूक दिली. इतकंच नाही तर त्याला कित्येक तास त्याच्या सीनची वाट पाहत बसावं लागायचं.

एक काळ असा होता जेव्हा इंडस्ट्रीत फक्त गोविंदाच्या (govinda) नावाची चर्चा व्हायची. ९० च्या दशकात गोविंदा सुपरस्टार होता. प्रत्येक दिग्दर्शक त्याला आपल्या सिनेमात घेण्यासाठी उत्सुक असायचे. त्यावेळी त्यांच्याकडे सिनेमांच्या रांगा लागायच्या. पण, एक काळ असा आला ज्यावेळी गोविंदाला काम मिळणं कमी झालं. एकेकाळी सुपरस्टार असलेला हा अभिनेता कालांतराने सिनेमांमध्ये सपोर्टिंग रोल करु लागला. मात्र, एका सिनेमामधून तर त्यांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सिनेमात रणबीर कपूर (ranbir kapoor) लीड रोलमध्ये होतो. 

प्रचंड लोकप्रियता, यश पाहिलेल्या गोविंदाला कालांतराने इंडस्ट्रीत काम मिळणं कमी झालं. त्यामुळे त्यांनी सपोर्टिंग रोल करण्यासही सुरुवात केली. मात्र, जग्गा जासूस या सिनेमात सपोर्टिंग रोल करत असूनही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ज्यामुळे ते प्रचंड कोलमडून गेले होते. इतकंच नाही तर सेटवरही त्यांना अत्यंत वाईट प्रकारची वागणूक मिळाली. ज्युनिअर आर्टिस्टपेक्षाही वाईट वागणूक त्यांना मिळाल्याचं म्हटलं जातं.

'जग्गा जासूस'च्या सेटवर गोविंदा यांना कित्येक तास त्यांच्या सीनची वाट पाहत बसावं लागायचं. एकेकाळचा सुपरस्टार असूनही त्यांना ज्युनिअर आर्टिस्टरपेक्षाही हीन दर्जाची वागणूक देण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला होता.

'जग्गा जासूस' या सिनेमात गोविंदादेखील होता. मात्र, ऐनवेळी त्यांचे सीन सिनेमातून कट करण्यात आले. गोविंदाने साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन या सिनेमाचं शुटिंग केलं होतं. त्यावेळी ते आजारी होते. मात्र, या आजारपणातही त्यांनी सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं. परंतु, ज्यावेळी सिनेमा रिलीज झाला त्यावेळी त्यांचे सीन सिनेमातून कट करण्यात आले होते.

दरम्यान, या सिनेमाविषयी आणि गोविंदाविषयी अनुराग बासू यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे गोविंदाची चूक असल्याचं सांगितलं. गोविंदा कधी सेटवर यायचा तर कधी नाही. कधी त्यांची फ्लाइट कॅन्सल व्हायची तर कधी फ्लाइट बोर्ड होत होती. पण, आम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांची फार काळ वाट पाहत बसू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही गोविंदाचा पूर्ण रोलच सिनेमातून स्कीप केला, एसं स्पष्टीकरण अनुराग बासूने दिलं होतं.

टॅग्स :बॉलिवूडगोविंदारणबीर कपूरसिनेमासेलिब्रिटी