सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल हे सांगता येत नाही. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर घराणेशाहीवर टीका होताना दिसत आहे. तसेच बॉलिवूडच्या स्टारकिड्सलादेखील ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर त्यांचे इंस्टाग्राम व ट्विटरवर फॉलोव्हर्सच्या संख्येतदेखील घट झाली आहे. यादरम्यान बरेच व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचा एक जुना व्हिडिओदेखील व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत अमिताभ बच्चन यांच्याबद्दल असे काही ऐकून कदाचित त्यांचे चाहते नाराज होतील.
या व्हिडिओत कादर खान सांगत आहेत की अमिताभ बच्चन खासदार बनल्यानंतर त्यांना लोक सरजी बोलू लागले होते. त्यात कादर खान अमिताभ बच्चन यांना सर म्हणाले नाहीत म्हणून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
कादर खान म्हणाले की, एका दाक्षिणात्य निर्मात्याने त्यांना अमिताभ बच्चन यांना सरजी बोलण्याचा सल्ला दिला होता. पण ते तयार झाले नाहीत. कारण ते नेहमीच त्यांना प्रेमाने अमित म असे संबोधायचे. जेव्हा त्यांनी निर्मात्यांचा सल्ला ऐकला नाही तर त्यांना चित्रपटातून डच्चू देण्यात आला. याच कारणामुळे खुदा गवाह चित्रपट हातातून निघून गेला. त्यामुळे कादर खान व अमिताभ बच्चन यांचे रिलेशनशीप खराब झाले होते.
कादर खान यांचे म्हणणे होते की जेव्हापासून अमिताभ बच्चन यांनी राजकारणात पाऊल टाकले तेव्हापासून जवळपास आमच्या नात्यात कटूता आली. ते म्हणाले की, जेव्हा ते खासदार बनून दिल्लीला गेले तेव्हा मी खूश नव्हतो. कारण राजकारणात माणूस गेला की तो बदलून जातो. जेव्हा ते परत आले तेव्हा ते माझेवाले अमिताभ बच्चन नव्हते. मला या गोष्टीचा खूप वाईट वाटले.
कादर खान यांचे 31 डिसेंबर, 2018 ला निधन झाले. त्यांचा मुलगा सरफराज म्हणाला होता की मरण्यापूर्वी सर्वात जास्त ते अमिताभ बच्चन यांची आठवण काढत होते.