Join us

'बेबो'ची डिमांड अन् करण जौहर संतापला; करिना कपूरला चित्रपटातून काढलं, ९ महिने चेहराही नाही पाहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 12:57 PM

करण जोहर आणि करिना कपूर खान एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. पण 2002 मध्ये दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते..करण जवळपास 1 वर्ष करिनाशी बोलला नव्हता.

करण जोहर आणि करिना कपूर खान यांची मैत्री तर जगजाहीर आहे. अनेकदा दोघे पार्टी करताना किंवा गेट टुगेदरमध्ये एकत्र दिसतात. करण आणि करिनामध्ये खूप चांगलं बाँडिंग आहे. करणने करिनाच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. पण दोघांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा दोघांनी एकमेकांचे तोंडही पाहिचं नव्हतं.

तु्म्हाला वाचून आश्चर्य वाटले पण करण जोहर आणि करीना कपूर खान यांच्यातील भांडणाचं कारण पैसे होते. करणने त्याच्या 'अॅन अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. 2003 मध्ये आलेल्या 'कल हो ना हो' चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान ही चर्चा झाली होती. 2002 मध्ये करीना कपूर, हृतिक रोशन आणि राणी मुखर्जी स्टारर 'मुझसे दोस्ती करोगे' रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. यामुळे करिना नाराज होती.

चित्रपट रिलीज झाल्यावर करण जोहरने पहिल्या वीकेंडला करिना कपूरला फोन केला होता. करणने करिनाला 'कल हो ना हो' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची ऑफर दिली. पण करिनाने करणला सांगितले की, ती चित्रपटात तेव्हाच काम करेल जेव्हा तिला शाहरुख खानइतके मानधन मिळेल. हे ऐकून करणला धक्काच बसला. त्याने स्वत:च करिनाला नकार दिला.

करिना कपूरच्या अशा बोलण्याने करण जोहर दुखावला होता. या चित्रपटाची निर्मिती कारणचे वडील यश जोहर करत होते. करिनाने या चित्रपटात काम करावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांच्या सांगण्यावरून त्याने पुन्हा करिनाला फोन केला, पण करिनाने त्याचा फोन उचलला नाही. करिनाचे हे वागणं करणला चांगलंच खटकलं ते पाहून त्याने लगेच प्रिती झिंटाला ऑफर दिली. प्रितीने चित्रपटात काम करण्यास होकार दिला.

यानंतर जवळपास १ वर्ष करण जोहर करिनाशी बोलला नव्हता. प्रकरण इथपर्यंत आलं की दोघे जवळपास ९ महिने एकमेकांचा चेहरा देखील बघत नव्हते. यादरम्यान यश जोहरच्या यांच्या प्रकृती खालावली यानंतर करिनाने करणला वडिलांच्या तब्येतीच विचारपूस करण्यासाठी फोन केला आणि दोघांमधील मतभेद कायमचे दूर झाले.  

टॅग्स :करण जोहरकरिना कपूरशाहरुख खान