बेगम करिना कपूर खान (Kareena Kapoor ) आणि नवाब सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची जोडी म्हणजे बॉलिवूडची एक लोकप्रिय जोडी. या ना त्या निमित्ताने या जोडीची चर्चा होत असतेच. ‘टशन’ सिनेमाच्या सेटवर सैफ व करिना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर ‘निकाह’ करून मोकळे झालेत. आता दोघांना दोन मुलांचे पालक आहेत. पण आजही दोघांचं प्रेम कायम आहे. कदाचित म्हणूनच दोघंही कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना गमावू इच्छित नाही. याच एका भीतीपोटी करिनाने अर्जुनला किस करायला नकार दिला होता.
लग्नानंतर करिना फिल्म इंडस्ट्री सोडेल, असं काही लोकांना वाटलं होतं. पण करिनानं लोकांचा हा अंदाज खोटा ठरवला. उलट लग्नानंतर तिनं ‘की अॅण्ड का’ सारखा बोल्ड सिनेमा स्वीकारला. या सिनेमात करिना कपूर व अर्जुन कपूर एकत्र दिसले.या सिनेमात करिनाचा बोल्ड अवतार पाहून प्रत्येकजण स्तब्ध झाला होता. अगदी अर्जुन कपूरसोबत बेबोने दिलेले किसींग सीन्स हा सर्वांसाठी धक्का होता. पण तो सिनेमा होता, प्रत्यक्षात मात्र असं काही करायला सांगितल्यावर बेबो चांगलीच बिथरली होती.होय, ‘की अॅण्ड का’च्या प्रमोशनदरम्यान करिनाला अर्जूनसोबतचा किसींग सीन रिक्रिएट करण्याची मागणी करताच, ती चवताळली होती. मी असं काहीही करू शकत नाही, मी अर्जुनला किस केलं तर माझा घटस्फोट होईल, असं ती म्हणाली होती.
तुम्हाला कदाचित माहित नसे. पण ‘की अॅण्ड का’ याच सिनेमाच्या शूटींगदरम्यान आपण प्रेग्नंट असल्याचे करिनाला कळले होते. यानंतर काही महिन्यांनी तिने तैमूरला जन्म दिला होता. करिना व सैफ यांच्या 10 वर्षाचं अंतर आहे. यावरून करिना व सैफवर टीकाही झाली. पण दोघांनीही कधीच या टीकेची पर्वा केली नाही. 16 ऑक्टोबर 2012 रोजी करिना व सैफचा निकाह झाला होता. लग्नानंतर चार वर्षांनी करिनाने पहिल्या मुलाला म्हणजे तैमूरला जन्म दिला. 2021 मध्ये म्हणजे याचवर्षी करिना दुस-यांदा आई बनली.