कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) बच्चन कुटुंबाची सून होणार होती. अभिषेक बच्चन व करिश्माचा साखरपुडाही झाला होता. पण अचानक सगळं फिस्कटलं. साखरपुडा मोडला आणि बच्चन व कपूर कुटुंबात कायमचा दरी निर्माण झाली. सगळ्यांनाच हा एपिसोड ठाऊक आहे. पण इतकंच नाही. बच्चन कुटुंबाआधी करिश्मा खन्ना कुटुंबाची सून होणार होती. होय, लोलो विनोद खन्नांची सून होणार होती. अभिषेक बच्चन याच्याआधी करिश्मा अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) प्रेमात होती. दोघं लग्नही करणार होते. पण प्रत्यक्षात असं काहीच घडलं नव्हतं.
यानंतर काही वर्षांनी करिश्माचा अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा झाला. पण हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. याचंही कारण करिश्माची आई बबीताच ठरली. असं म्हणतात की, करिश्माने लग्नानंतर चित्रपटात काम करू नये, अशी बच्चन कुटुंबाची इच्छा होती. करिश्माची आई बबीताचा याला विरोध होता. याचमुळे अभिषेक व करिश्माचा साखरपुडा मोडला. अर्थात खरं कारण काय होतं, हे आजही रहस्य आहे.
पुढे करिश्माने संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली. अभिषेकही लग्नबंधनात अडकला. अक्षय खन्ना मात्र आजही अविवाहित आहे. अद्याप लग्न का केलेलं नाही? असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये अक्षयला विचारण्यात आला होता. त्यावर आपण कमिटमेंटसाठी तयार नसल्याचं त्याने म्हटलं होतं. 'लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे मी कुणालाही कमिटमेंट देण्यास अजून तयार नाही. प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी आपण विचार करतो. लग्न हा असा निर्णय आहे ज्याच्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. लग्नानंतर मुलांचा विचार करावा लागतो. त्यांची जबाबदारी वाढते, बाकी गोष्टी बाजूला ठेवून तुम्हाला त्यांना वेळ द्यावा लागतो. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि मी त्यासाठी अजूनही तयार नाही,'असं तो म्हणाला होता.