एका भीषण अपघातामुळे खराब झाला होता महिमा चौधरीचा चेहरा, लोक उडवली लागले होते खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:40 PM2021-04-06T12:40:27+5:302021-04-06T13:09:05+5:30

Mahima chaudhary talk about her accident : महिमाचा डेब्यू सिनेमा खरे तर हिट होता. पण तरीही तिचे फिल्मी करिअर फार चालले नाही.

When mahima chaudhary met with a horrific car accident | एका भीषण अपघातामुळे खराब झाला होता महिमा चौधरीचा चेहरा, लोक उडवली लागले होते खिल्ली

एका भीषण अपघातामुळे खराब झाला होता महिमा चौधरीचा चेहरा, लोक उडवली लागले होते खिल्ली

googlenewsNext

अभिनेत्री महिमा चौधरी आज बॉलिवूडमध्ये गायब झाली आहे. शाहरूख खानसोबत ‘परदेस’ सिनेमातून तिने डेब्यू केला होता. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला ‘डार्क चॉकलेट’ हा तिचा अखेरचा सिनेमा. त्यानंतर ती कुठल्याच सिनेमात झळकली नाही. महिमाचा डेब्यू सिनेमा खरे तर हिट होता. पण तरीही तिचे फिल्मी करिअर फार चालले नाही. 1999मध्ये आलेल्या 'दिल क्या करे' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान महिमा एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावली होती. याचा खुलासा अभिनेत्रीने स्वत: केला आहे. 


बॉलिवूड बबल या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत महिमाने या भीषण अपघाताबद्दल सांगितले.  महिमा अजय देवगण व काजोलसोबत ‘दिल क्या करे’चे शूटींग करत होती. याचदरम्यान हा भीषण अपघात घडला होता. बेंगळुरूमध्ये स्टुडिओकडे निघाली असताना तिच्या कारला ट्रकने धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या काचेचे अनेक तुकडे महिमाच्या चेह-यावर रतून पडले होते.


महिमाने सांगितले, ‘त्या अपघातातून मी मरता मरता वाचले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी जेव्हा आरशात पाहिले तेव्हा धक्काच बसला होता. डॉक्टरांनी माझ्या चेह-यात रूतून बसलेले 67 काचांचे तुकडे काढले होते. तो खूप भयानक अनुभव होता. अपघातानंतर बरेच दिवस मला घरीच राहावे लागले. कारण उजेडात, कॅमे-याच्या लाइटमध्ये जाण्यास बंदी होती. मी स्वत:ला आरशात पाहू शकत नव्हते. . या अपघानंतर माझ्या करिअरलाही ब्रेक लागला. माझ्या हातून चित्रपटांच्या ब-्याच ऑफर्स निघून गेल्या. अपघाताविषयी मी कोणाला फार काही सांगितले नाही. कारण चेहरा खराब झाला हे कळले तर लोक मला काम देणार नाहीत, ही भीती मला होती.


या अपघातातून महिमा चौधरी बरी झाली तेव्हा नीना लुल्लाने मला ‘प्यार कोई खेल नहीं’ या चित्रपटात एक गाणे दिले. अक्षय कुमारने तिला ‘धडकन’मध्ये संधी दिली. त्याकाळात मी लपतछपत वावरत होते, या कठीण काळात कुटुंबीयांनी फार मदत केल्याचेही तिने सांगितले. तर मी़डियातले काहीजण तिची थट्टा करु लागले. त्यावेळी तिचे सहकारी कलाकार आणि निर्माते अजय देवगन आणि काजोल यांनी तिला भक्कम आधार दिला होता. 


 

Web Title: When mahima chaudhary met with a horrific car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.