Join us

किस्सा: जेव्हा तब्बल २४ वर्षांनंतर नरगिस दत्त यांनी घाबरतच ठेवला होता आर.के. स्टुडिओमध्ये पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 15:21 IST

Nargis Love Story : नरगिस अनेक वर्ष राज कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. पण नंतर जेव्हा राज कपूरने लग्नासाठी टाळाटाळ केली आणि वेळ कमी देणं सुरू केलं तेव्हा हे नातं कमजोर पडलं. 

बॉलिवूडची मदर इंडिया म्हणजे नरगिस दत्त (Nargs Dutt) आणि शोमन राज कपूर (Raj Kapoor) या जोडीला खूप यश मिळालं. पण त्यांच्या कामाऐवजी त्यांच्या अफेअरचीच चर्चा जास्त रंगत होती. त्याची चर्चा तर आजही होते. नरगिस अनेक वर्ष राज कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. पण नंतर जेव्हा राज कपूरने लग्नासाठी टाळाटाळ केली आणि वेळ कमी देणं सुरू केलं तेव्हा हे नातं कमजोर पडलं. 

नरगिसने राज कपूरसोबतच आर.के.स्टुडिओसोबतही नातं तोडलं होतं. नंतर ऋषी कपूरच्या लग्नावेळी २४ वर्षांनी नरगिसने आर.के.स्टुडिओमद्ये पाउल ठेवलं होतं. याचा उल्लेख ऋषी कपूर यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये केला. याचा पूर्ण किस्सा त्यांनी लिहिला आहे.

ऋषी कपूर म्हणाले की, '२४ वर्षांनी आर.के.स्टुडिओमध्ये पाउल ठेवत असताना नरगिस फारच घाबरलेली होती. त्यांची अडचणी माझी आई कृष्णा राज कपूरने ओळखलं आणि ती त्यांना कोपऱ्यात घेऊन गेली'.

ऋषी कपूर यांच्यानुसार, कृष्णा राज कपूरने नरगिसला समजावत सांगितलं की, 'माझी आई त्यांना म्हणाली होती की, माझे पती हॅंडसम आहे आणि रोमॅंटिक आहे.  त्यांच्याप्रति आकर्षण मी समजू शकते आणि यावेळी तुम्ही काय विचार करताय हे मला समजू शकतं. पण जे काही झालं होतं त्यात तुमची एकटीची चूक नव्हती. त्यामुळे स्वत:ला दोष देऊ नका. तुम्ही माझ्या घरी आनंदाच्या क्षणी आल्या आणि आजपासून आप मैत्रिणी आहोत'.

यानंतर कृष्णा राज कपूरने नरगिसला राज कपूरच्या वागण्याबाबत सांगितलं. त्या म्हणाल्या की, 'तुमच्या लग्नानंतर राज कपूर पूर्णपणे बिथरले होते. ते नेहमीच रात्री दारू पिऊन घरी येत होते आणि बाथटबमध्ये लेटून रडत होते. सोबतच ते स्वत:ला सिगारेटचे चटकेही देत होते.

दरम्यान, १९८६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राज कपूर म्हणाले होते की, 'मदर इंडिया' सिनेमा साइन करून नरगिसने त्यांना दगा दिला आहे. या गोष्टीसाठी मी तिला कधीच माफ करू शकत नाही. 

टॅग्स :नर्गिसराज कपूरआर के स्टुडिओ