बॉलिवूड अभिनेता नवाजद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या कामापेक्षा जास्त आपल्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आबे. पत्नी आलियासोबत त्याचे भावांसोबतचं नात्यात देखील दुरावा आला आहे. एकंदरीत नवाजच्या वैयक्तिक आयुष्यात काहीच चांगले चालले नाही. नुकतेच नवाज आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी वर्सोवा येथील त्याच्या भावाच्या बंगल्यावर पोहोचला, पण तरीही तो आपल्या आईला भेटू शकला नाही. त्याच पावली त्याला परतवं लागलं.
नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या आयुष्यातील वाईट टप्प्यातून जात आहे. आधी भाऊ शमास नवाब सिद्दीकीशी आणि आता दुसरा भाऊ फैजुद्दीनशी असलेले त्याचे असलेले मतभेद सगळ्यांना माहिती आहेत. नवाज 2 मार्च रोजी त्याची आजारी आई महरुनिसा यांना भेटण्यासाठी त्याचा दुसरा भाऊ फैजुद्दीनच्या घरी पोहोचला, परंतु अभिनेत्याला त्याच्या आईला भेटू दिलं नाही.
अभिनेत्याला दिली नाही घरात एंट्री!इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, काल रात्री नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी मुंबईतील वर्सोवा येथील भाऊ फैजुद्दीनच्या बंगल्यावर पोहोचला. तो त्याच्या आईला भेटण्यापूर्वीच त्याचा भाऊ फैजुद्दीनने त्याला घरात जाण्यापासून रोखले. भाऊच नाही तर आईच्या केअरटेकरनेही त्याला रोखले.
भाऊ काय म्हणाला?फैजुद्दीनने स्पष्टपणे सांगितले की, आईची तब्येत ठीक नाही आणि तिला कोणालाही भेटायचे नाही. फैजुद्दीनने घरात प्रवेश न दिल्यानंतर नवाज परतला. नवाजुद्दीन सिद्दीकी उद्या डेहराडूनहून परत येणार होता. पण आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे तो लवकर परतला.