‘रणबीर दाल-चावल टाईप लडका है, हाई-फाई पत्नी नहीं संभाल सकता...’ होय, हे शब्द आहेत,रणबीर कपूरची आई नीतू सिंग यांचे. आज नीतू यांचा वाढदिवस. त्यानिमित्त अख्खे कपूर कुटुंब सध्या पॅरिसमध्ये आहे. अख्ख्या कुटुंबाने पॅरिसमध्ये नीतू सिंग यांचा वाढदिवस साजरा केला. रणबीरही या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला. याचदरम्यान नीतू यांनी फर्स्ट पोस्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत नीतू पहिल्यांदा रणबीरच्या रिलेशनशिप स्टेट्सबद्दल बोलल्या. रणबीर मुलगा म्हणून कसा आहे, तो किती हळवा आहे, त्याचा नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोण कसा आहे, हे सगळे त्यांनी आईच्या नजरेतून सांगितले.
रणबीर कमालीची हळवा आहे, इथून नीतू यांनी सुरूवात केली. त्या म्हणाल्या की, रणबीर कुणाचेच दु:ख पाहू शकत नाही. त्याच्या तोंडून कधीच नाही निघत नाही. हेच त्याच्या नात्यांनाही लागू पडत. त्याला ना म्हणताचं येत नाही आणि मग याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. मी अनेकदा अनेकप्रकारे त्याला समजवण्याचे प्रयत्न केलेत. काही मुली रणबीरच्या आयुष्यात होत्या. पण त्या त्याच्यासाठी योग्य नव्हत्या. मी याबद्दल वेळोवेळी रणबीरला सावध करायचे. पण तो मलाचं विरोध करायचा. मग मी ही गोष्ट त्याला दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगितली. एखादी मुलगी तुला आवडली तर तू तिला जाणून घे. तिच्याशी बोल, तिच्यासोबत फिर. फक्त घाईघाईत कुठलीही कमिटमेंट करू नकोस, असे मी त्याला समजावले.रणबीरच्या आयुष्यात कशी मुलगी असलेली तुम्हाला आवडेल, असे विचारले असता, त्याला साधी सरळ मुलगी हवी, अशा त्या म्हणाल्या. रणबीर कमालीचा लाजाळू आहे. तो स्वत:हून कुण्याच मुलीला अॅप्रोच झाल्याचे मी पाहिले नाही. रणबीरचा साधेपणा समजून घेणारी मुलगी त्याला मिळावी, असे मला वाटते. ‘रणबीर दालचावल टाईप सिंपल लडका है. कोई हाई मेंटेनेंस टाईप लडका नहीं. इसलिए वह कोई हाई प्रोफाईल व हाई लाईफस्टाईलवाली पत्नी संभाल नहीं पाएगा,’ असे त्या म्हणाल्या.तुम्हाला ठाऊक आहेच की, सध्या रणबीर व आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात आहेत. आलिया नीतू सिंग यांनाही पसंत असल्याचेही कानावर येतेय. आलियाआधी रणबीर कॅटरिना कैफसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. पण अचानक त्यांचे ब्रेकअप झाले होते. कॅटरिनापूर्वी दीपिका पादुकोण रणबीरच्या आयुष्यात होती.