बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे (Akshay Kumar) अनेक सिनेमे गेल्या काही महिन्यांत आलेत आणि आले तसे आपटले. होय, बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, रामसेतू असे चारही एकापाठोपाठ आलेले सिनेमे फ्लॉप गेलेत. 90 च्या दशकातही अक्षयच्या वाट्याला असंच अपयश आलं होतं. त्याकाळात अक्षयचे अनेक सिनेमे फ्लॉप झाले होते आणि हे पाहून एका निर्मात्याने त्याची खिल्ली उडवली होती. अगदी तुझी लायकी काय? असं म्हणत या निर्मात्याने अक्षयचा अपमान केला होता. त्याक्षणी अक्षयच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
दिग्दर्शक सुनील दर्शनने ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला.
काय होता हा किस्सा...सुनील दर्शन यांनी सांगितलं की, ‘1999 मध्ये अक्षयचा जानवर हा सिनेमा रिलीज होणार होता. हा सिनेमा मीच दिग्दर्शित केला होता. माझ्या सिनेमात अक्षय लीड हिरो होता. पण त्याआधी अक्षयचा आणखी सिनेमा रिलीजसाठी सज्ज होता. या सिनेमाचे होर्डिंग्स जागोजागी लागले होते. पण त्यावर अक्षयच्या नावाचा साधा उल्लेखही नव्हता. अक्षय मेन हिरो होता, पण सिनेमाच्या होर्डिंग्समध्ये त्याचा साधा उल्लेखही नाही म्हटल्यावर अक्षयला धक्का बसला होता. त्याने त्या चित्रपटाच्या निर्मात्याला याबद्दल जाब विचारला. पण निर्मात्याने उलट अक्षयलाच सुनावलं. तुझी लायकी नाहीये ती, असं म्हणत निर्मात्याने अक्षयचा अपमान केला. निर्मात्याची ते शब्द ऐकून अक्षयला प्रचंड दु:ख झालं.
तो माझ्या ऑफिसात आला. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. लागोपाठ सुपरफ्लॉप सिनेमांमुळे आज आपल्याला अपमान गिळावा लागला, याचं दु:ख अक्षयच्या चेहºयावर होतं. मलाही त्याला पाहून दु:ख झालं होतं. कारण तो माझ्या जानवर सिनेमाचा हिरो होतो. त्याक्षणी मी निर्णय घेतला. जानवरच्या बॅनरमध्ये अक्षयला सर्वांत फ्रंटमध्ये ठेवण्याचं मी ठरवलं. 48 तासांच्या आत मुंबईतच्या सर्वांत उंच होर्डिंगवर जानवरचं पोस्टर दिसायला हवं, असं मी माझ्या स्टाफला बजवालं. या पोस्टरवर अक्षयला सर्वाधिक हायलाईट केलं जावं, असंही मी सांगितलं. इतकंच नाही तर या पोस्टरमधून मी सिनेमाच्या दोन्ही हिराईन शिल्पा शेट्टी व करिश्मा कपूर यांनाही गाळलं...