Join us

जेव्हा सलमान करतो कॅटला सरप्राइज...

By admin | Published: February 04, 2016 1:49 AM

सल्लूमियाँ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे जवळचे, नातेवाईक, मित्रमंडळ यांना जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा तो प्रयत्न करतो.

सल्लूमियाँ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे जवळचे, नातेवाईक, मित्रमंडळ यांना जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. नुकताच कतरीनाचा रणबीर कपूर सोबत बे्रकअप झाले. त्यादरम्यान, कॅटने सलमानसोबत जवळीक केली. तसेच ‘सुल्तान’ चित्रपटाविषयी कँडिड चॅट देखील सलमानसोबत तिने केली. नंतर कॅट ‘फितूर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमानच्या रिअ‍ॅलिटी शो वर आली. नेहमीप्रमाणे हसतखेळत सलमानने चित्रपटाचे प्रमोशन केले. मात्र, कतरीना आणि आदित्य रॉय कपूर एका टीव्ही शोवर प्रमोशनसाठी गेले असता कुणालाही काहीही माहित नसताना सलमानने अचानक एन्ट्री घेतली. सर्वजण शॉक झालेले, कॅटला मात्र खुप आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावरून तो आनंद ओसंडून वाहत होता. सलमानने तिला चक्क हे सरप्राईजच दिले असे म्हणावे लागेल. तिच्यासारखाच आनंद आदित्यलाही झाला.