Join us

जेव्हा संजय दत्त करणार होता ऋषी कपूरची पिटाई..!

By admin | Published: February 03, 2017 11:25 AM

टीना मुनिमशी अफेअर असल्याच्या संशयावरून संजय दत्त ऋषी कपूरना मारहाण करणार होता.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - बॉलिवूडचा हँडसम हिरो रणबीर कपूर ' खलनायक' संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करण्यास सज्ज झाला आहे. मात्र त्याच संजय दत्तला रणबीरचे बाबा, अर्थातअभिनेता ऋषी कपूरची पिटाई करायची होती, हे सांगितलं तर तुम्हाला पटेल का? पण हो , ही गोष्ट खरी आहे. खुद्द ऋषी यांनीच त्यांच्या 'खुल्लमखुल्ला' या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला असून अभिनेता गुलशन ग्रोव्हर यांनीही या घटनेला दुजोरा देत तो किस्साही कथन केला.
 
(ऋषी कपूर यांची बिग बींबद्दल तक्रार!) 
(...तर अभिजीतला नपूंसक केले असते - ऋषी कपूर बरसले)
(ऋषी कपूर यांची दाऊदसोबत ‘चाय पे चर्चा’!)
 
' संजूचे तेव्हा टीना मुनिमसोबत प्रेमसंबंध होते. पण चिंटूशीही ( ऋषी कपूर यांचे टोपणनाव) तिचे प्रेमप्रकरण आहे, असा संशय संजूला होता. मी आणि संजू दोघेही भावाप्रमाणे होतो. त्यामुळे त्याने मला एक दिवस सांगितलं की, आपल्याला चिंटूच्या घरी जाऊन त्याला बदडायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही तेथे गेलोही, पण तेवढ्यात नीतूजींनी (ऋषी यांची पत्नी) आम्हाला थांबवलं आणि टीना-चिंटू यांच्यात असं काहीही नसल्याची ग्वाही दिली. त्यामुळे संजू शांत झाला आणि आम्ही तेथून निघालो' अशी माहिती गुलशन ग्रोव्हर यांनी दिली. त्यानंतर काही काळाने ऋषी कपूर आणि नीतू सिंग विवाहबद्ध झाले.