Join us  

प्रियंका चोप्राच्या कानाखाली मारण्यासाठी सेटवर गेली होती ट्विंकल? अक्षय कुमारला सोडावा लागला होता सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 1:20 PM

प्रियंका चोप्राचे नाव शाहरुख खान आधी अक्षय कुमारशी जोडलं गेलं होते. रिपोर्टनुसार भडकलेली ट्विंकल खना प्रियंकाला मारण्यासाठी एकदा सिनेमाच्या सेटवर गेली होती.

प्रियंका चोप्रा सध्या चर्चेत आहे. अलिकडेच एका मुलाखती दरम्यान तिने बॉलिवूडबाबत अनेक धक्कादायक खुलासे केलेत. 'ऐतराज', 'डॉन 2', 'गुंडे', 'अग्निपथ २', '७ खून माफ' यांसारखे अनेक हिट सिनेमे देणाऱ्या प्रियांका चोप्राला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. तिला चित्रपटाच्या ऑफर येणं कमी झालं होतं. मला इंडस्ट्रीत एका कोपऱ्यात ढकलले जात होते. लोक कास्ट करत नव्हते. लोकांच्या तक्रारी होत्या. रिपोर्टनुसार त्यावेळी प्रियंका चोप्रासोबत A लिस्टर्स अभिनेते काम करायला तयार नव्हते. यात यादीत अक्षय कुमारच्या नावाचादेखील समावेश होता.

 दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडायची. त्याच दरम्यान दोघांच्या अफेअर्सची जोरदार चर्चा रंगली होती.  त्यानंतर ट्विंकल खना  फार इनसिक्योर झाली होती. एक काळ असा होता की, अक्षय आणि प्रियंकाची जोडी सुपरहिट जोडी होती. दोघांनी सोबत अंदाज, ऐतराज आणि वक्त सिनेमात काम केलं. मीडिया रिपोर्टनुसार, 2003 मध्ये आलेल्या अंदाज सिनेमाच्या शूटिंग दरम्यान प्रियांका आणि अक्षय कुमारची जवळीक वाढली होती.

 पूर्ण इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या जवळ येण्याची चर्चा रंगली होती. असं सांगण्यात येतं की, ही बातमी ट्विंकलपर्यंतही पोहोचली होती. त्यानंतर ती फार इनसिक्योर झाली होती. अशाही बातम्या आल्या होत्या की, एक दिवस ट्विंकल खन्नाने प्रियंचा चोप्राला फोन करून अक्षयपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. पण तरीही ट्विंकलच्या बोलण्याचा काही असर दिसला नव्हता. त्यानंतर रागाच्या भरात ट्विंकलने जे केलं होतं त्याची खूप चर्चा झली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय आणि प्रियंकाची जवळीकीला वैतागून ट्विंकल वक्त सिनेमाच्या सेटवर पोहोचली होती. असं सांगितलं जातं की, ती खूप रागात होती आणि ती प्रियंकाला शोधत होती. पण त्या दिवशी प्रियांका सेटवर नव्हती. अशात  अक्षय कुमारने पत्नी ट्विंकलला कसंतरी शांत केलं आणि घरी पाठवलं. असं म्हणतात की, यानंतर अक्षय कुमार प्रियांकापासून दूर गेला आणि 2005 मध्ये रिलीज झालेल्या वक्त सिनेमानंतर त्याने प्रियंकासोबत पुन्हा सिनेमाही केला नाही.

 

टॅग्स :प्रियंका चोप्राअक्षय कुमारट्विंकल खन्ना