टीव्हीएफ ओरिजिनल शो 'कोटा फॅक्ट्री' सीझन 3 ची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सीरिजचा चाहतावर्ग मोठा आहे. शोमधील जितू भैय्या हे पात्र तर खूपच गाजलं. ही भूमिका साकारणारा अभिनेत्री जितेंज्र कुमार लोकप्रिय झाला. तर वैभव जो आयआयटी जेईईची तयारी करत आहे त्याच्याभोवती सीरिजची कहाणी फिरते. सीरिजचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
2019 साली कोटा फॅक्ट्री चा पहिला सिझन टीव्हीएफ(TVF) आणि नंतर युट्यूबवरही आला. या सीरिजने तरुणांचं मन जिंकलं. राजस्थानच्या कोटा शहरात दरवर्षी लाखो विद्यार्थी शिकतात. आयआयटी जेईई या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या परिस्थितीतून जावं लागतं याची कहाणी सांगणारी ही सीरिज आहे. सीरिजचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.गेल्याच महिन्यात नेटफ्लिक्सने कोटा फॅक्ट्री सिझन 3 चा फर्स्ट लूक जारी केला.
नेटफ्लिक्स इंडियाने अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर सीझन 3 ची झलक दाखवली. याचं कॅप्शन असं की,"पेन्सिलचं टोक शार्प करा आणि सगळे फॉर्म्युला पाठ करा. जीतू भैय्या आणि त्यांचे विद्यार्थी सर्वात मोठ्या आव्हानासाठी तयार होत आहेत."
कधी रिलीज होणार?
आगामी सीरिजच्या रिलीजची उत्सुकता असणाऱ्यांमध्ये एक कोटा फॅक्टरी आहे. सीझन 3 कधी रिलीज होणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र आयपीएल संपल्यानंतर सीरिज प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे. याचा अर्थ २६ मे नंतरच सीरिज पाहायला मिळेल. यावर्षीच्या सेकंड हाफमध्ये सीरिज प्रदर्शित होईल असा अंदाज आहे.
कोटा फॅक्ट्रीमध्ये जितेंद्र कुमार, मयूर मोरे, अहसास चन्ना, रंजन राज, आलम खान, उर्वी सिंह आणि रेवती पिल्लई यांच्या भूमिका आहेत.