परिणीती चोप्रा कधी करणार राघव चड्ढासोबत लग्न?, पापाराझींच्या प्रश्नांवर अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 04:18 PM2023-05-31T16:18:31+5:302023-05-31T16:19:21+5:30

Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्राने आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत १३ मे २०२३ रोजी दिल्लीतील कपूरधला हाऊसमध्ये एंगेजमेंट केली.

When will Parineeti Chopra get married to Raghav Chadha?, the actress said to paparazzi's questions... | परिणीती चोप्रा कधी करणार राघव चड्ढासोबत लग्न?, पापाराझींच्या प्रश्नांवर अभिनेत्री म्हणाली...

परिणीती चोप्रा कधी करणार राघव चड्ढासोबत लग्न?, पापाराझींच्या प्रश्नांवर अभिनेत्री म्हणाली...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्याशी १३ मे २०२३ रोजी दिल्लीतील कपूरधला हाऊसमध्ये एंगेजमेंट केली. या कार्यक्रमाला अनेक राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लंडनहून प्रियंका चोप्राही तिच्या चुलत बहिणीच्या एंगेजमेंटसाठी दिल्लीला पोहोचली होती. आता सर्व चाहते परिणीती आणि राघवच्या लग्नाची तारीख जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. ते कधी आणि कुठे लग्न करणार आहे हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. अशा स्थितीत परिणीती चोप्राने पापाराझींसोबत लग्नाच्या तारखेबाबत मस्करी केली.

मंगळवारी पापाराझींनी परिणीती चोप्राला तिच्या मुंबईतील घराबाहेर पाहिले. यावेळी ती पांढऱ्या कॉटन सूटमध्ये दिसली. तेव्हाच पापाराझी कॅमेरा घेऊन तिच्यापर्यंत पोहोचले आणि लग्नाच्या तारखेबाबत विचारपूस करू लागले. मग परिणीती हसायला लागली. आधी तिने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि नंतर मौन सोडले. पापाराझींनी परिणीती चोप्राला विचारले, 'तुझे लग्न कधी होणार आहे?' यावर ती गप्प राहिली आणि गाडीच्या दिशेने जाऊ लागली. पापाराझीने पुन्हा लग्नाबद्दल विचारले, ' अरे परी जी, कृपया मला लग्नाची तारीख सांगा. असे लपवू नका. तर यावेळी परीने हसत चुप्पी तोडली आणि म्हणाली, 'ईशाला विचारा. तिला माहित आहे. एवढंच बोलून परिणीती तिथून निघून गेली.

परिणीती चोप्राने अलीकडेच दिल्लीतील एंगेजमेंटचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती भावूकही होताना दिसली. तिने सांगितले की हा क्षण तिच्यासाठी खूप खास होता, जे पाहून ती भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. राघव चड्ढा आणि परिणीती नुकतेच राजस्थानला पोहोचले होते. त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कदाचित तीदेखील प्रियंकाप्रमाणे उदयपूरमध्ये लग्न करू शकते.

Web Title: When will Parineeti Chopra get married to Raghav Chadha?, the actress said to paparazzi's questions...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.