बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री ज्या इंडस्ट्रीपासून दूर गेल्या आणि संसारात रमल्या. घराची जबाबादारी सांभाळत दुस-या क्षेत्रात कार्यरत आहेत. याच लिस्टमध्ये ट्विंकल खन्नाची बहीण रिंकी खन्नाही गणली जाते. ट्विंकल खन्ना इतकी रिंकी खन्ना जास्त लाइमलाइटमध्ये नसते.
डिंपल कपाडीया आणि राजेश खन्ना यांची धाकडी लेक रिंकी खन्ना सध्या काय करत याबाबत फारसे कोणाला जास्त माहिती नाही. गेल्या अनेकवर्षापासून ती झगमगाटाच्या दुनियेपासून लांबच आयुष्य एन्जॉय करत आहे. ट्विंकलची धाकटी बहीण रिंकी 43 वर्षांची आहे. रिंकीने बॉलिवूडमध्येही करिअर करण्याचा प्रयत्न केला,पण तिच्या प्रयत्नांचा हवे तसे यश मिळाले नाही.
रिंकीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा ती अवघ्या 17 वर्षाची होती. रिंकीची बॉलिवूड कारकीर्द खूपच लहान होती. रिंकीने चार वर्षांच्या कारकीर्दीत सुमारे 9 सिनेमात काम केले आहे.
रिंकी खन्ना शेवटची 'चमेली' सिनेमात झळकली होती. त्यानंतर तिने फेब्रुवारी 2003 मध्ये व्यावसायिक समीर सरनशी लग्न केले. लग्नानंतर रिंकी खन्नाने बॉलिवूडमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला आणि संसारात रमली.
लग्नानंतर रिंकी पती समीर सरनबरोबर लंडनमध्ये स्थायिक झाली आणि दीड वर्षानंतर ऑक्टोबर 2004 मध्ये तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. रिंकीच्या मुलीचे नाव नाओमिका आहे. मुलीच्या जन्माच्या 9 वर्षानंतर रिंकी 2013 मध्ये पुन्हा आई बनली आणि मुलाला जन्म दिला.
रिंकीने वर्ष 1999 मध्ये प्यार या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा झी सिने पुरस्कारही मिळाला. यानंतर ती गोविंदा आणि सोनाली बेंद्रे यांच्या 'जिस देश में गंगा रेहता है' या सिनेमात एक सहाय्यक भूमिकेत दिसली होती. यानंतर रिंकीने ''मुझे कुछ कहना है' या सिनेमातही सहायक भूमिकेतच दिसली. रिंकी खन्ना केवळ मोठ्या पडद्यापासून दूर नाही तर लाइमलाइटमध्येही राहणे तिला आवडत नाही.
रिंकी कोणत्याच गोष्टीमुळे चर्चेत राहत नाही. एवढेच नाही तर रिंकी सोशल मीडियावरही एक्टीव्ह नाही. सिनेमामध्ये दिसण्यापूर्वी रिंकीचे नाव रिन्कल होते. आई-वडिलांनी दोन्ही मुलींचे नाव ट्विंकल आणि रिंन्कल ठेवले. सिनेमात आल्यानंतर रिंकलच्या नावात बदल करुन रिंकी केले गेले.
गेल्या वर्षी रिंकी खन्ना आपली मुलगी नाओमिका सारण, आई डिंपल कपाडिया आणि बहीण ट्विंकल खन्नासोबत दिसली होती. रिंकेची मुलगी आता 17 वर्षांची आहे आणि मुलगा 8 वर्षांचा आहे.