Join us

'काल भैरव रहस्य २' साठी चित्रीकरण करताना गौतम रोडेचा बसला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 7:23 PM

'काल भैरव रहस्य २'मध्ये वीरवर्धनची भूमिका साकारताना गौतम रोडेचा आवाज बसला आहे

ठळक मुद्दे'काल भैरव रहस्य २' मालिका २७ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला

काही कलाकार भूमिका स्वीकारताना आणि त्या साकारताना आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जात नाहीत. पण, काही मात्र त्या व्यक्तिरेखेमध्ये शिरून आपले सर्वोत्तम देतात. 'काल भैरव रहस्य २'मध्ये वीरवर्धनची भूमिका साकारताना गौतम रोडे आपला आवाज हरवून बसला. 

आपल्या कठोर मेहनत आणि उत्तम व्यक्तिरेखांसाठी मानला जाणाऱ्या गौतमने कथानकाच्या मागणीनुसार चित्रीकरणाच्या वेळेस खूप आरडाओरडा केली आणि अर्थातच त्याचा त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. ह्यासाठी खूप एनर्जीची गरज होती. मात्र यामुळे गौतमचा घसा बसला.गौतम म्हणाला,  'मला व्यक्तिरेखा चांगल्याप्रकारे साकारायला आवडतात.  'काल भैरव 'च्या चित्रीकरणाच्या वेळेसही निर्मात्यांनी मी खोटा खोटा शॉट द्यावा असे सुचवले, पण मी मानले नाही. अशा व्यक्तिरेखा शरीरावर परिणाम करतातच. पण ते चालायचेच. मी गरम पाणी पित आहे आणि औषधेही सुरू आहेत. ''कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन लवकर स्टार भारत वाहिनीवर दाखल होणार आहे. पापा बाय चांस मालिकेच्या जागी ही मालिका संध्याकाळी सात वाजता प्रसारीत होणार आहे. 'कालभैरव रहस्य' मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी दुसरा सीझन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या भागात छवी पांडे, राहुल शर्मा व सरगुन कौर प्रमुख भूमिकेत होते. 'कालभैरव रहस्य'च्या दुसऱ्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत गौतम रोडे व अदिती गुप्ता दिसणार आहे. यांच्याव्यतिरिक्त या मालिकेत सिद्धांत कर्णिक, सोनिया सिंग व आयाम मेहता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका एका मंदिरातील रहस्यावर आधारीत असणार आहे आणि यावेळेस मालिकेत बंगला व त्यात राहणारे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मंदिरावर आधारीत असणार आहे. ही मालिका २७ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'कालभैरव रहस्य' मालिकेच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :काल भैरव रहस्य २