Join us

'कोण आमिर खान? मी त्याला ओळखत नाही..', अभिनेते अन्नू कपूर यांचे धक्कादायक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 15:51 IST

Annu Kapoor On Aamir Khan Film: अन्‍नू कपूर यांनी आमिर खान आणि 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाबाबत एक धक्कादायक विधान केले आहे.

Annu Kapoor On Laal Singh Chaddha: सध्या आमिर खान (Aamir Khan) आणि त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पण, सोशल मीडियावर चित्रपटाच्या बहिष्काराची मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता सुप्रसिद्ध अभिनेता अन्नू कपूर (Annu Kapoor) यांनीही आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

'काय आहे लाल सिंग चड्ढा?'अन्नू कपूर यांच्या 'हम दो हमारे बारह' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. या संदर्भात, मीडियाशी संवाद साधताना त्यांना आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाबद्दल विचारण्यात आले. यावर अन्नू कपूर यांचे उत्तर ऐकून उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले. 'आमिर खानच्या लाल सिंह चड्ढाबद्दल तुम्हाला काय वाटतं?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अन्नू कपूर म्हणाले- 'हे काय आहे? मी चित्रपट पाहत नाही, मला याबाबत काही माहिती नाही.'

'कोण आमिर खान?'अन्नू कपूर यांच्या उत्तरावर कोणीतरी म्हणाले, “नो कॉमेंट्स.” पण, अन्नू यांनी आपले बोलणे चालू ठेवत म्हणाले- “नो कॉमेंट्स कशाला. मी खरच चित्रपट पाहत नाही. स्वतःचाही नाही आणि इतरांचाही नाही. आमिर खान कोण आहे, हे खरोखर मला माहित नाही. मला काहीच कल्पना नाही." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अन्नूंच्या प्रतिक्रियेवर टीका अन्नू कपूर यांनी आमिर खान आणि लाल सिंग चड्ढावर दिलेली प्रतिक्रिया धक्कादायक आहे. ते चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेत्यांपैकी एक आहे. अशा स्थितीत त्यांच्याकडून अशा प्रतिक्रियेची अपेक्षा करता येणार नाही. त्यांच्या प्रतिक्रियेवर लोक त्यांना 'रूड' म्हणत आहेत. 

 

टॅग्स :आमिर खानअन्नू कपूरलाल सिंग चड्ढा