Join us

बिझनेस वूमन आहे रणदीप हुड्डाची होणारी बायको; शाहरुख-प्रियांकासोबत आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 11:00 AM

Randeep hooda girlfriend: येत्या २९  तारखेला रणदीप आणि लीन लग्नाच्या बेडीत अडकले जाणार आहेत.

कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत त्यामुळे एका पाठोपाठ अनेक नावाजलेले कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यामध्येच आता बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डा (Randeep hooda) बोहल्यावर चढणार आहे. रणदीप त्यांच्या लाँग टाइम गर्लफ्रेंड लीन लॅशराम (lin laishram) हिच्यासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे सध्या त्याची आणि त्याच्या गर्लफ्रेंडची चर्चा होतीये. लीन लॅशराम नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

येत्या २९  तारखेला रणदीप आणि लीन लग्नाच्या बेडीत अडकले जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. यामध्येच रणदीपची होणारी पत्नी नेमकं करते काय? तिचा कलाविश्वाशी संबंध काय असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. तर, लीनचा कलाविश्वाशी जवळचा संबंध असून शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, करीना कपूर यांसारख्या कलाकारांसोबत तिचा जवळचा संबंध आहे.

कोण आहे लीन लॅशराम?

लीन सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयीच्या अनेक चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगत असतात. लीन मॉडेल, अभिनेत्री आणि यशस्वी बिझनेस वूमनदेखील आहे.

लीन मूळची मणिपूरमधील इंफाळ येथील असून ती प्रियांका चोप्राच्या 'मेरी कॉम' या सिनेमात झळकली आहे. तसंच तिने 'रंगून', 'उमरिका' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर शाहरुखच्या ओम शांती ओम या सिनेमातही तिने स्क्रीन शेअर केली आहे. अलिकडेच ती करिना कपूरच्या 'जाने जान' या सिनेमात झळकली.

स्वीमसूट परिधान करणारी पहिली मणिपुरी मॉडेल

लीन लॅशराम ही पहिली मणिपुरी मॉडेल आहे जिने स्वीमसूट परिधान केला होता. परंतु, पडद्यावर स्वीमसूट घातल्यामुळे तिच्या घरातल्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.लीनने काही सिनेमांमध्ये मुख्य भूमिकाही साकारल्या होत्या परंतु, ते सिनेमा काही कारणास्तव रिलीज झाले नाहीत. गेल्या ४-५ वर्षांपासून लीन मुंबईत राहत असून तिच्या फिल्मी करिअरकडे लक्ष देत आहे.

बिझनेस वूमन आहे लीन

लीन धनुर्विद्येत कुशल असून ती धनुर्विद्येमध्ये ज्युनिअर नॅशनल चॅम्पिअन ठरली आहे. इतकंच नाही तर बिझनेस वूमन आहे. तिचा स्वत:चा ज्वेलरीचा व्यावसाय आहे. दरम्यान, रणदीप आणि लीन यांची पहिली भेट २०१८ मध्ये एका स्टेडिअममध्ये झाली होती. त्यानंतर मैत्री आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. ४-५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :रणदीप हुडाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाशाहरुख खानप्रियंका चोप्रा