Join us

विक्रमचा नक्की कोणाशी होणार साखरपुडा? ‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार जगावेगळा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 07:15 IST

छत्रीवाली मालिकेत विक्रम आणि मधुराचे नाते निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे.

छत्रीवाली मालिकेत विक्रम आणि मधुराचे नाते निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. मधुरा आणि विक्रमच्या लग्नाची बोलणी सुरु असतानाच या दोघांच्या नात्यात नीलमची एण्ट्री झाली. विक्रमचे मधुरावर जीवापाड प्रेम असले तरी विक्रमचे लग्न नीलमशी व्हावे ही विक्रमच्या आईची अंतिम इच्छा होती. त्यामुळे विक्रमचा साखरपुडा नक्की नीलमशी होणार की मधुराशी याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

गायकवाड कुटुंबाने विक्रमच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. या अनोख्या सोहळ्यासाठी दोन खास पाहुण्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. ऋषी सक्सेना आणि सायली संजीव विक्रमच्या साखरपुड्यामध्ये खास हजेरी लावणार आहेत. तसेच ‘छत्रीवाली’मध्ये मधुरा विक्रमची लव्हस्टोरी निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिलीय. विक्रम आणि मधुराचं नातं निर्णायक वळणावर असतानाच आता सदानंद यांच्या एंट्रीने ही गुंतागुंत आणखी वाढणार आहे. एकीकडे मधुरावरचं प्रेम तर दुसरीकडे आईची अंतिम इच्छा हा गुंता विक्रम कसा सोडवणार? याची उत्कंठावर्धक कहाणी ‘छत्रीवाली’च्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. मधुराच्या आईला म्हणजेच होणाऱ्या सासुबाईंना विक्रम त्याच्या आणि मधुराच्या नात्यासाठी कसे तयार करणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

छत्रीवाली मालिकेचा हा विशेष एपिसोड शनिवार २६ जानेवारीला फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :छत्रीवालीस्टार प्रवाह