बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan )अलीकडेच सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. अवार्ड शोला तर त्याने कधीचाच रामराम ठोकलाय. आमिर कोणत्याही अवार्ड शोला जात नाही. आज नाही तर अनेक वर्षांपासून अवार्ड शो म्हटला की, तो दूर पळतो. असे का तर आज ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (why Aamir Khan stopped attending awards functions)
तर गोष्ट आहे 1992 सालची.1992 साली बॉलिवूडचे तीन सिनेमे रिलीज झाले होते. तिन्ही सिनेमे एकदम सुपरडुपर हिट. पहिला सिनेमा होता अनिल कपूरचा बेटा, दुसरा होता अमिताभ बच्चन यांचा खुदा गवाह आणि तिसरा होता आमिर खानचा जो जीता वही सिकंदर. तिन्ही सिनेमे सुपरहिट. या सिनेमांवर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात. बॉक्स ऑफिसवर तिन्ही चित्रपटांनी बक्कळ कमाईही केली.
साहजिकच अवार्डची वेळ आली तेव्हा तिन्ही सिनेमे आणि त्यांच्या कलाकारांमध्ये काट्याची टक्कर होती. पण आमिरला मात्र आपल्या चित्रपटाला अवार्ड मिळेल, असा विश्वास वाटत होता. त्याच्या सिनेमाला प्रेक्षकांचे प्रेमच इतके मिळाले होते की, आपला पुरस्कार पक्का असे त्याला वाटत होते. पण फिल्मफेअर अवार्ड जाहिर झाला आणि बेस्ट अॅक्टरचा अवार्ड आमिरऐवजी अनिल कपूरच्या वाट्याला गेला. हा ‘सिलसिला’ इथेच थांबला नाही तर पुढच्या दोन वर्षांतही आमिरच्या झोळीत कुठलाच पुरस्कार पडला नाही.
हम है राहीं प्यार के आणि रंगीला या दोन्ही सिनेमे कमाल चालले. पण आमिरला फिल्मफेअरपासून आयफापर्यंत एकही अवार्ड मिळाला नाही. याऊलट बाजीगर व दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेसाठी शाहरूखला बेस्ट अॅक्टरचा अवार्ड मिळाला. आमिरचे मन खट्टू झाले नसेल तर नवल. यानंतर त्याने अवार्ड शोमध्ये कधीही न जाण्याची जणू शपथच घेतली. माझा अवार्डवर विश्वास नाही, असे तो म्हणतो.राष्ट्रीय पुरस्कार घ्यायला आमिर आवर्जुन जातो. पण प्रायव्हेट अवार्ड शोमध्ये तो फिरकतही नाही.