पॉर्न सिनेमांचं जाळं हे जगभरात मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. पॉर्न सिनेमे जे ब्लू फिल्म म्हणूनही ओळखल्या जातात, त्या प्रत्येक वर्गात पाहिल्या जातात. अॅडल्ट कंटेन्टवर आधारित हे सिनेमे भलेही खुलेआम बघण्याची बंदी असेल पण बघणारे कमी नाहीयेत. आज जगभरात पॉर्न सिनेमांचा बिझनेस कोट्यवधींचा झाला आहे. पण या सिनेमांची सुरुवात कधी झाली असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या सिनेमांना ब्लू फिल्म का म्हटलं जातं असाही प्रश्न अनेकदा समोर येतो. चला जाणून घेऊ यामागचं कारण....
का म्हणतात ब्लू फिल्म?
अॅडल्ट सिनेमांना ब्लू फिल्म हे नाव मिळण्यामागेही एक विचित्र कारण सांगितलं जातं. असे म्हणतात की, या सिनेमांचे पोस्टर ब्लू म्हणजेच आकाशी निळ्या रंगांच्या बॅकग्राऊंडने तयार केले जात होते. अशात प्रश्न हाही आहे की, या पोस्टरसाठी निळा रंग का निवडला जायचा? यावर असे सांगितले जाते की, निळा रंग सहजतेने लोकांना आपल्याकडे खेचतो. ज्यामुळेच या सिनेमांमध्ये निळ्या रंगांचा वापर केला जातो.
असेही म्हटले जाते की, ग्रेट ब्रिटनमधून ब्लू फिल्म या शब्दाचा उदय झाला. हा शब्द तेथे कामूक गोष्टींशी संबंधित गोष्टींसाठी वापरला जात होता. काही अश्लिल आणि घाणेरड्या गोष्टींसाठी देखील ब्लू या शब्दाचा वापर केला जायचा. ब्रिटनमध्ये आधी ब्लू लॉ म्हणजेच कायदे असायचे. रविवारी धार्मिक कार्यांवेळी दारुविक्री सारख्या वाईट गोष्टींवर प्रतिबंध ठेवण्यासाठी हे कायदे असायचे.
ब्लू लॉमध्ये या सिनेमांची नावे फारच वेगळ्या प्रकारे सादर करण्यात आली आहेत. असे म्हटले जाते की, अनेक वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये ब्लू लॉ एक धार्मिक कायदा होता. हा कायदा चर्चने तयार केला होता. ज्यावेळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी भारतातील शहरी लोकं हे ब्लू लॉबाबत जाणून होते. अशात त्यावेळी जे लोक रविवारी फिल्म बघत होते त्यांना ब्लू म्हटले जायचे. ब्लू लॉ विरोधात असल्याने या सिनेमांना ब्लू फिल्म म्हटले जात असल्याची मान्यता आहे. काही काळाने ब्लू लॉ संपुष्टात आला पण या सिनेमांना ब्लू फिल्म म्हणने काही बंद झाले नाही.