Join us

अपयशी का ठरल्या दिग्दर्शकांच्या जोड्या?

By admin | Published: February 01, 2016 1:51 AM

पुढच्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून विनय-राधिका या दिग्दर्शकांची जोडी खूप वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये परत येत आहे.

पुढच्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून विनय-राधिका या दिग्दर्शकांची जोडी खूप वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये परत येत आहे. या जोडीने २००५ मध्ये सलमान खान आणि न्यूकमर स्नेहा उलाल यांना घेऊन ‘लकी’ हा चित्रपट बनविला होता. शानदार संगीत असूनही बॉक्स आॅफीसवर चित्रपट चालला नाही. याच जोडीने सनी देओल आणि कंगनासोबत ‘आई लव न्यू-ईयर’ बनविला होता, जो खूप हलाखीत बनला आणि वादविवादात प्रदर्शित झाला. आता ही जोडी ‘सनम तेरी कसम’ घेऊन येत आहे, ज्यात दोन नवीन चेहरे दिसणार आहेत. राधिका-विनयसारख्या अनेक जोड्यांनी बॉलीवूडमध्ये नशीब अजमावले आहे. परंतु यातील अनेकांना अपयशाचाच सामना करावा लागला आहे. याला अपवाद आहे तो फक्त अब्बास-मस्तान या जोडीचा. फरहाद-साजिद यांच्या जोडीने अक्षय कुमारला घेऊन ‘एंटरटेन्मेंट’ बनविला. पण हा चित्रपट चालला नाही. आणि आता हीच जोडी ‘हाऊसफुल ३’चे दिग्दर्शन करीत आहे. विकास बहल आणि नितेश तिवारी या दोघांनी मिळून लहान मुलांच्या कथेवरील ‘चिल्लर पार्टी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. नंतर दोघेही वेगळे झाले. नितेश तिवारी सध्या आमिर खानसोबत ‘दंगल’ बनवित आहेत. या यादीत अजून एक जोडी आहे, जे एकाच चित्रपटानंतर वेगळे झाले होते. राजकंवर यांचे साहाय्यक दिग्दर्शक मनीष शर्मा आणि रोहित नैय्यर या जोडीने आफताब शिवदासानी आणि ग्रेसी सिंह यांच्यासोबत २००४ मध्ये ‘मुस्कान’ चित्रपट बनविला होता, जो फ्लॉप ठरला होता.- anuj.alankar@lokmat.com