Join us

देव आनंद यांना काळे कपडे वापरण्यावर कोर्टाने का घातलेली बंदी? हे आहे धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 5:18 PM

देवानंद यांना काळे कपडे घालण्यापासून कोर्टाने बंदी घातलेली? आश्चर्यकारक जाणून घ्या

देव आनंद हे दिग्गज अभिनेते. बॉलिवूडमधील चिरतरुण अभिनेते म्हणून देव आनंद यांची ओळख सांगितली जाते. देव आनंद यांचे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या स्मराणात आहेत. मग ते 'गाईड' असो, 'हरे रामा हरे कृष्णा' असो की 'हम दोनो..'. देव आनंद यांच्या सिनेमांचे आजही असंख्य चाहते आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत देव आनंद यांचा खास किस्सा. जिथे देव आनंद यांना काळे कपडे वापरण्यापासून थेट कोर्टाने बंदी घातली होती. काय घडलं होतं असं?

देव आनंद यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये असंख्य सिनेमे गाजवले. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत एकेकाळी पांढरा शर्ट आणि काळा कोट इतका लोकप्रिय केला होता की लोकं त्यांची कॉपी करू लागले. मग एक वेळ अशी आली की, देव आनंद यांना सार्वजनिक ठिकाणी काळा कोट घालण्यास बंदी घालण्यात आली. प्रत्यक्षात काही मुलींनी देव आनंद यांच्या प्रेमापोटी काळा कोट घालून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या, असं सांगितलं जातं.

 क्वचितच असा एखादा अभिनेता असेल की ज्याच्यासाठी वेडेपणा इतका दिसला. त्यामुळे या प्रकरणात कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला. आणि देव आनंद यांना काळा कोट वापरण्यावर कोर्टाने कायदेशीर बंदी घातली. देव आनंद हे इतके देखणे होते की त्यांच्यासाठी लोकं वेडी होती. आजही देव आनंद यांचं नाव मनोरंजन विश्वात आदराने घेतलं जातं.

टॅग्स :देव आनंदबॉलिवूड