Join us

'मेकअप का केलास, चेहरा...', प्रिया बापटनं सांगितला 'मुन्नाभाई MBBS'च्या शूटिंगदरम्यानचा 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 16:18 IST

Priya Bapat : 'मुन्नाभाई MBBS' शूटिंगदरम्यानचे किस्से एका मुलाखतीत प्रिया बापटने सांगितले.

अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat)  हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती खूप चर्चेत आली आहे. कारण तिचा सिटी ऑफ ड्रिम्सचा तिसरा सीझन नुकताच भेटीला आला आहे. या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान या सीरिजच्या निमित्ताने प्रियाने कर्ली टेल्सच्या तेरी गली मैं या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

प्रिया बापट हिने या कार्यक्रमात तिच्या बालपणीचे किस्से सांगितले. यावेळी तिला 'मुन्नाभाई MBBS' चित्रपटातील अनुभवाबद्दल विचारले. त्यावर प्रियाने सांगितले की,  'मुन्नाभाई MBBS' या चित्रपटावेळी मी कॉलेजमध्ये होते. त्यावेळी मी बालकलाकार म्हणून काम करत होते. त्यामुळे शूटिंगसाठी पोहचल्यावर कोणाला कोणत्या नावाने हाक मारु हे कळतच नव्हते. तेव्हा मी राजू सरांना तुम्हाला अंकल म्हणू का, असे विचारले होते. त्यावर त्यांनी नको, तू मला राजू म्हण असे सांगितले होते.

 'मुन्नाभाई MBBS'मधील एकाही सीनसाठी केला नव्हता मेकअपराजकुमार हिरानी यांच्यासोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल प्रिया बापटने सांगितले की, राजू सर खूप चांगले आहेत. एक दिग्दर्शक कलाकाराला घडवत असतो  यावर माझा विश्वास आहे. माझा चेहऱ्यावरील मेकअप पाहून त्यांनी पहिल्याच दिवशी हा मेकअप का केलास, असे विचारले. आणि म्हटले की, चेहरा धुवून टाक. जसी आहेस तशी छान वाटते. असे सांगून राजू सरांनी मला संवाद कसे बोलावेत याविषयी मार्गदर्शन केले होते. या चित्रपटातील एकाही सीनसाठी मी मेकअप केला नव्हता, ते दिवस फार सुंदर होते.

टॅग्स :प्रिया बापटराजकुमार हिरानी