बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा सतत जाम चर्चेत आहे. 15 फेब्रुवारीला दीयाने वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दीया वैभवच्या प्रेमात पडली आणि पाठोपाठ त्याच्यासोबत लग्न करून मोकळी झाली.‘रहेना है तेरे दिल में’ या सिनेमातून फिल्मी करिअर सुरु करणारी दीया आज बॉलिवूडमध्ये फार सक्रिय नाही. पण म्हणून तिच्या सौंदर्यावर, तिच्या मनमोहक हास्यावर फिदा असणा-यांची संख्या कमी आहे.
फ्रँक हँडरिच आणि दिपा असे दीयाच्या आईवडिलांचे नाव आहे. वडील जर्मन आणि आई बंगाली हिंदू असल्याने तिच्यावर दोन्ही धर्मांचा प्रभाव आहे. दीया साडेचार वर्षांची असताना तिच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दोघांनी पुन्हा लग्न केले. तिच्या आईने अहमद मिर्झासोबत दुसरे लग्न केले. त्यामुळे दिया त्यांचेच नाव लावते.
दीया नऊ वर्षांची असताना तिच्या पहिल्या वडिलांचा मृत्यू झाला. अशात दुसºया वडिलांनी दीयाला कधीही वडिलांची कमतरता भासू दिली नाही. सावत्र वडिल असूनही त्यांनी दीयाला अगदी लाडाकौतुकात वाढवले. त्यांनी कधी तिच्या पहिल्या वडिलांची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट तिच्या मनात एक स्वतंत्र अशी जागा निर्माण केली. त्यामुळे दीया तिच्या नावापुढे तिच्या सावत्र वडिलांचे नाव लावते.
दीया आज चित्रपटात अधिक काम करत नसली तरी ती सामाजिक कार्यात अग्रेसर असते. सामाजिक समस्या आणि प्रश्न यांची जाणीव असलेली दीया या अनेक एनजीओमार्फत काम करते. होईल तेवढी समाजाची सेवा करण्याचे व्रत तिने स्वीकारलेय. आजवर तिने महिलांसाठी एचआयव्ही जागरूकता, कॅन्सरच्या रूग्णांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे घेतली आहेत. नर्मदा बचाओ आंदोलनालाही तिने पाठिंबा दर्शवला होता.