Join us

'शोले'मध्ये हेमा मालिनी व संजीव कुमार एकाही सीनमध्ये दिसले नाहीत एकत्र, हे आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 8:00 PM

शोले चित्रपटामध्ये एकाही सीनमध्ये हेमा मालिनी आणि संजीव कुमार एकत्र पहायला मिळाले नाहीत.

बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट शोले आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविताना दिसतो. या चित्रपटातील सर्व पात्र आजही रसिकांना चांगलेच लक्षात आहेत. त्यात तुम्हाला माहित आहे शोलेमध्ये ठाकूरची भूमिका साकारणारे संजीव कुमार व बसंतीची भूमिका साकारणाऱ्या हेमा मालिनी यांचे एकही सीन नाही आहेत. त्यात तर बसंती व ठाकूर एकाच गावातील असतात. इतकंच नाही तर जय व वीरूला घेऊन बसंतीच ठाकूरच्या घरी पोहचले. असे असले तरी संजीव कुमार संपूर्ण सिनेमात कुठेही बसंतीचं नाव घेतानाही दिसत नाहीत. ही गोष्ट हैराण करणारी आहे. 

हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्या अफेयरच्या चर्चा सत्तरच्या दशकात खूप रंगल्या होत्या. असंही म्हटलं जातं की संजीव कुमार हेमा मालिनी यांना मागणी घालण्यासाठी  घरीदेखील गेले होते. परंतु हेमा मालिनी यांच्या आईने त्यांना साफ नकार दिला होता. तरीही संजीव कुमार यांनी प्रयत्न सोडले नव्हते आणि त्यांनी आपला चांगला मित्र जितेंद्रकडे लव लेटर हेमा मालिनी यांच्याकडे पाठवले होते.

जितेंद्र स्वतः हेमा मालिनीसाठी वेडे होते. त्यांनी संजीव कुमार यांचे लव लेटर हेमा मालिनी यांना आपल्या नावाने दिले होते. हेमा मालिनी यांची आई संजीव कुमार यांच्या त्रासापासून मुक्त करू इच्छित होती. त्यासाठी त्यांनी धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांच्या जवळ जाण्यास सांगितले. पण जेव्हा धर्मेंद्र हेमा मालिनींवर आपला अधिकार दाखवू लागले तेव्हा हेमा यांच्या आईची आणखी डोकेदुखी वाढली. तेव्हा जितेंद्र यांनी हेमासोबतच्या लग्नाचा प्रस्ताव हेमा मालिनी यांच्या आईसमोर मांडला. हेमा यांची आई या लग्नासाठी तयार झाली आणि त्यांनी हेमा मालिनी यांनादेखील यासाठी तयार केले.

अशी बातमी समोर आली होती की जितेंद्र पंडित आणि पाहुण्यांसोबत हेमाच्या घरी वरात घेऊन गेला होता. जेव्हा धर्मेंद्र यांना ही गोष्ट समजली तेव्हा ते खूप संतापले आणि तिथे पोहोचले.

इकडे जितेंद्र यांची होणारी बायको देखील हेमा मालिनींच्या घरी पोहोचली. अशाप्रकारे जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न मोडले. त्यानंतर संजीव कुमार यांनी एक दिवस शोलेच्या सेटवर हेमा मालिनी यांना प्रपोज केले. जेव्हा ही गोष्ट धर्मेंद्र यांना कळली त्यावेळी ते खूप संतापले आणि रमेश सिप्पी यांना जाऊन सांगितले कि त्यांनी चित्रपटामध्ये असा कोणताही सीन ठेवू नये की हेमा मालिनी आणि संजीव कुमार एकत्र येतील.

संजीव कुमार हेमा मालिनी यांच्या उत्तराची वाट पाहत राहिले आणि धर्मेंद्र यांनी बाजी मारली.

टॅग्स :हेमा मालिनीसंजीव कुमारधमेंद्रजितेंद्र