Join us

आसारामच्या जन्मठेपेवर राखी सावंतने उपस्थित केला प्रश्न, काय म्हणाली ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 5:07 PM

जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आसारामला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यावर निर्णयावर अनेकांनी आनंद व्यक्त केलाय.

मुंबई : जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आसारामला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निर्णयावर अनेकांनी आनंद व्यक्त केलाय. यात कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतनेही प्रतिक्रिया दिली आहे. 

नेहमीच वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणारी राखी सावंत हिने या निर्णयावर आपल्या स्टाईलने प्रतिक्रिया दिली आहे. राखीने आसारामला मिळालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर समाधान व्यक्त केलंय. पण तिने सोबतच आश्चर्यही व्यक्त केलंय. राखीने जोधपूर कोर्टाच्या निकालावर प्रश्न उपस्थित केलाय. 

राखीने प्रश्न उपस्थित केला की, आसारामला केवळ जन्मठेपेची शिक्षा का दिली गेली? त्याला फाशीची शिक्षा का दिली नाही. ती म्हणाली की, हे त्यांच्यासाठी उत्तम उदाहरण आहे ज्यांना वाटतं की, ते महिला आणि लहान मुलांसोबत काहीही करु शकतात. पण या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा का नाही?

टॅग्स :राखी सावंतआसाराम बापू