‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्व पात्रे म्हणजे अण्णा, शेवंता, माई, पांडू, सुसल्या ही देखील खूपच लोकप्रिय झाली. कोकणातील माणसाची नेमकी नस पकडणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांना आपली वाटू लागली. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे याचे तिसरे पर्वही प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘रात्रीस खेळ चाले 3’ (Ratris Khel Chale 3) अत्यंत रंजक वळणावर आली असताना अचानक कोरोनाची दुसरी लाट आली आणि महाराष्ट्रात अनेक मालिकांचं शूटींग खोळंबलं. ‘रात्रीस खेळ चाले 3’ ही या मालिकेचं चित्रीकरणी थांबलं. अन्य मालिकांनी कथानकामध्ये थोडा बदल करून दुस-या राज्यात जाऊन आपल्या मालिका सुरू ठेवल्या. पण ‘रात्रीस खेळ चाले 3’ रखडली ती रखडलीच.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘रात्रीस खेळ चाले 3’चे शूटींग सुरू होते. पण राज्य सरकारनं चित्रीकरणावर बंदी आणल्याने शूटींगला ब्रेक लागला. यामागचं कारण म्हणजे, वाडा. होय, ‘रात्रीस खेळ चाले 3’मधील वाडा हा मालिकेतील महत्त्वाचा भाग आहे. असा वाडा अन्य कुठंही मिळंण कठीण होतं. या वाड्याशिवाय शूटींग शक्य नव्हतं. म्हणून ‘रात्रीस खेळ चाले 3’चं शूटींग अन्य कुठं हलवणंही शक्य नव्हतं.
आता राज्यात हळूहळू शूटींग सुरू झालेय. पण अद्यापही ‘रात्रीस खेळ चाले 3’च्या अडचणी संपलेल्या नाहीत. कारण या मालिकेचे चित्रीकरण हे कोकणात चालू आहे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं तिथं खूप जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे चित्रीकरणात व्यत्यय येतोय. पण तरीही लवकरच या मालिकेचं शूटिंग चालू होईल आणि ही मालिका नव्यानं आपल्याला पाहायला मिळेल, अशी आशा आहे.