बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्री म्हणजे रेखा(Rekha). बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीची लव्ह लाइफ चांगलीच चर्चेत राहिली. यात अमिताभ बच्चन आणि तिचं नातं तर जगजाहीर आहे. मात्र, बिग बींपासून दूर झाल्यानंतर रेखाने दिल्लीचे बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. इतकंच नाही तर मुकेश यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही ती गेली नव्हती. त्यामुळेच रेखाने या अंत्यसंस्काराला जाण्याचं का टाळलं यामागचं कारण बऱ्याच वर्षाने समोर आलं आहे.
१९९० मध्ये रेखा आणि मुकेश यांची पहिली भेट झाली होती. या भेटीचं मैत्रीत रुपांतर झालं आणि त्यानंतर ते प्रेमात पडले. विशेष म्हणजे या दोघांनी ४ मार्च १९९० रोजी लग्न केलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नानंतर काही महिन्यातच मुकेश आणि रेखा यांच्यात वाद होऊ लागले. रेखाने चित्रपटसृष्टी सोडावी यासाठी मुकेश दबाव टाकत होते. इतकंच नाही तर या काळात मुकेश डिप्रेशनचे शिकार झाले होते. परिणामी, त्याच्यातील वाद वाढत गेला आणि लग्नाच्या सहा महिन्यानंतर त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला.
जया बच्चनच्या 'या' ४ शब्दांमुळे झाला रेखा-अमिताभच्या ब्रेकअप? जाणून घ्या, काय घडलं त्या भेटीत
मुकेश यांनी घेतला गळफास
रेखा आणि मुकेश यांचा घटस्फोट झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यानंतर २ ऑक्टोबर १९९० रोजी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांनी एक चिठ्ठी लिहित, कोणालाही दोषी धरु नये असं स्पष्ट म्हटलं होतं. मात्र, तरीदेखील अनेकांनी रेखाला दोषी मानलं.
47 वर्षानंतर रेखा-अमिताभ बच्चन यांचे Unseen photos आले समोर;चाहते झाले थक्क
मुकेश यांच्या अंत्यसंस्काराला गेली नाही रेखा
मुकेश यांनी रेखाच्या ओढणीने गळफास घेतला होता. तसंच त्यांची आत्महत्या घटस्फोटाच्या महिन्याभरानंतर लगेच झाली होती. त्यामुळे अनेकांनी या सगळ्यासाठी रेखाला जबाबदार धरलं. इतकंच नाही तर, त्या काळात रेखाचा शेषनाग हा सिनेमा रिलीज झाला होता. मात्र, या सिनेमाच्या पोस्टरलाही लोकांनी काळ फारस रेखाचा धिक्कार केला होता. सर्व स्तरांमधून रेखाला पदोपदी अपमानित केलं जात होतं. त्यामुळेच हा अपमान सहन करत रेखाने मुकेशच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय घेतला.