Join us

म्हणून ‘कलंक’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये कुठेच दिसला नाही संजय दत्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 14:12 IST

आलिया भट, वरूण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर स्टारर ‘कलंक’ रिलीज झाला. रिलीजआधी या मल्टिस्टारर सिनेमाचे आक्रमक प्रमोशन केले गेले. पण या प्रमोशनमध्ये संजय दत्त कुठेच दिसला नाही.

ठळक मुद्देकाही दिवसांपूवी ‘कलंक’च्या प्रमोशनमधून गायब असण्याबद्दल संजयने खुद्द खुलासा केला होता.

आलिया भट, वरूण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर स्टारर ‘कलंक’ रिलीज झाला. रिलीजआधी या मल्टिस्टारर सिनेमाचे आक्रमक प्रमोशन केले गेले. पण या प्रमोशनमध्ये संजय दत्त कुठेच दिसला नाही. असे का? यावरून तूर्तास वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.‘कलंक’च्या प्रमोशनपासून संजयला जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले, अशीही चर्चा आहे. यामागचे कारण म्हणजे, राजकुमार हिरानी. होय, द एशियन एजने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कलंक’च्या प्रमोशनमधील संजयची अनुपस्थिती आणि राजकुमार हिरानी यांचे कनेक्शन आहे. 

तुम्हाला आठवत असेलच की, काही दिवसांपूर्वी संजय मीटूच्या आरोपांनी घेरलेल्या राजकुमार हिरानींची पाठराखण करताना दिसला होता. एका महिलेने राजकुमार हिरानींवर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना, राजकुमार हिरानींवरचे आरोपांवर मला मुळीच विश्वास नाही, असे संजय म्हणाला होता. यानंतर संजयला प्रचंड ट्रोल झाला होता. वृत्त खरे मानाल तर, हिरानींची बाजू घेणे संजयला महागात पडले. सोशल मीडियावर संजयवर होणारी टीका पाहून ‘कलंक’च्या मेकर्सनी  त्याला प्रमोशनपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. काहींच्या मते, माधुरी दीक्षितमुळेही संजयला प्रमोशनपासून लांब ठेवण्यात आले.

काही दिवसांपूवी ‘कलंक’च्या प्रमोशनमधून गायब असण्याबद्दल संजयने खुद्द खुलासा केला होता. फिल्म साईन केली तेव्हाच मुख्य प्रमोशनल इव्हेंटसोडून मी कुठल्याही प्रमोशनमध्ये सहभागी होणार नाही, असा माझा करार झाला होता. मी या चित्रपटात सपोर्टिंग रोलमध्ये आहे. मुख्य भूमिकेत नाही, त्यामुळे माझ्या नसण्याने चित्रपटाच्या प्रमोशनवर कुठलाही परिणाम होणार नव्हता, असे संजय म्हणाला होता. आता संजय म्हणतो ते खरे की मीडियातील चर्चा खरी, हे लवकर कळेलच.

टॅग्स :संजय दत्तराजकुमार हिरानीकलंकमाधुरी दिक्षित