Join us

सैफ अली खानला अमृता सिंगकडे १०० रुपये मागण्याची का आली होती वेळ?, वाचा हा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 6:00 AM

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. मात्र एकवेळ असा होता जेव्हा सैफ अमृता सिंगच्या प्रेमात वेडापीसा झाला होता

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. मात्र एकवेळ असा होता जेव्हा सैफ अमृता सिंगच्या प्रेमात वेडापीसा झाला होता. एकेकाळी अभिनेत्री अमृता सिंगच्या प्रेमात सैफ अली खान वेडा झाला होता. त्याने त्याच्या पहिल्या भेटीचा किस्सा एका चॅट शोमध्ये शेअर केला होता. त्यावेळी सैफ अली खान इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होता आणि अमृता त्यावेळी प्रसिद्धीझोतात होती. त्यावेळी एक दिवस जेव्हा सैफने अमृताकडे घरी जाण्यासाठी १०० रुपये मागितले होते आणि त्या बदल्यात अमृताने त्याला तिची कार घेऊन जायला सांगितले होते.

सुरूवातीपासून अभिनेत्री अमृता सिंग खूप बिनधास्त आणि बेधडक स्वभावाची होती. त्यावेळी ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बनलेली होती आणि सैफ त्यावेळी स्ट्रगल करत होता. १९९९ साली सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये दोघांनी त्यांच्या प्रेमाचे किस्से सांगितले होते.  सैफ अली खान आणि अमृता सिंगची पहिली भेट राहुल रवैलच्या चित्रपटादरम्यान झाली होती, या चित्रपटातून सैफ अली खान पदार्पण करत होता.

राहुल आणि अमृताची चांगली मैत्री होती त्यामुळे त्याने चित्रपटाच्या स्टारकास्ट सैफच्या फोटोशूटसाठी अमृताला निमंत्रित केले होते. यावेळी सैफ सेटवर येणाऱ्या पाहुण्यांसोबत होस्टसारखा व्यवहार करत होता. फोटोशूट दरम्यान सैफने अमृताच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि तेव्हा अमृताने त्याला चांगल्या रितीने नोटीस केले होते. अमृताला वाटू लागले होते की, सैफने अशारितीने हात ठेवून हिंमत दाखवली आहे. हे पहिल्या नजरेतील प्रेम नव्हते, पण काहीतरी होते की दोघे एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले होते.

हे फोटोशूट लगेच संपले पण सैफला रहावले नाही आणि त्याने अमृता सिंगचा फोन नंबर डायल केला. त्याने फोनवर अमृताला डिनरसाठी इन्वाइट केले. सैफने विचारले होते की माझ्यासोबत डिनरला यायला आवडेल का? त्यावर अमृताचे उत्तर चकीत करणारा होता. तिने म्हटले की, नाही, मी डिनरसाठी बाहेर जात नाही पण तुमची इच्छा असेल तर डिनरसाठी माझ्या घरी येऊ शकतो आणि सैफ त्या रात्री अमृताच्या घरी गेला. अमृताच्या घरात सैफ दोन दिवस राहिला होता.

सैफने अमृताकडे शंभर रुपये मागितले होते. इतकेच यादरम्यान त्यांनी एकमेकांना किसदेखील केली. खरेतर त्यासाठी अमृताने पुढाकार घेतला होता. यादरम्यान सैफला शूटसाठी जायचे होते. त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने अमृताकडे शंभर मागितले. त्यावर अमृताने त्याला तिची कार घेऊन जायला सांगितली. सैफ तिला म्हणाला होता की प्रोडक्शनची कार बाहेर उभी आहे. मात्र अमृताची इच्छा होती की त्याने तिची कार घेऊन जावे. म्हणजे कारच्या बहाण्याने ते पुन्हा भेटू शकतील. सैफ अली खान आणि अमृता सिंगने १९९१ साली लग्न केले होते आणि २००४मध्ये ते दोघे विभक्त झाले होते.

टॅग्स :सैफ अली खान अमृता सिंग