Join us  

परिणीती चोप्राच्या लग्नात का गैरहजर होती प्रियंका चोप्रा? आई मधु चोप्रा यांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:28 PM

Parineeti Chopra And Raghav Chaaddha : उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव यांनी सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

अखेर परिणीती चोप्रा(Parineeti Chopra)नेही लग्न केले. या वर्षी, अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि कियारा आडवाणी(Kiara Advani)नंतर, आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीने सात फेरे घेतले आहेत. २४ सप्टेंबर रोजी, लीला पॅलेस, उदयपूर येथे परिणीती चोप्रा(Parineeti Chopra)ने आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार राघव चड्ढा (Raghav Chhaddha) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र तिच्या लग्नात बहिण आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा गैरहजर होती. दरम्यान आता प्रियंकाची आई आणि परिणीतीची मावशी मधू चोप्रा यांनी हे लग्न कसे झाले आणि प्रियंका कार्यक्रमाला का आली नाही हे सांगितले.

२४ सप्टेंबरला लग्न आणि रिसेप्शन पार्टी आटोपून सर्वजण मुंबईला रवाना झाले. पण त्याआधीच पापाराझींनी उदयपूर विमानतळावर सर्वांना पाहिले. प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा देखील येथे दिसल्या होत्या. तेव्हा पापाराझीने त्याला अनेक प्रश्न विचारले, ज्यांची त्यांनी हसतमुखाने उत्तरे दिली. एका पापाराझीने मधु चोप्रा यांना विचारले लग्न कसे झाले आणि प्रियांका चोप्रा का आली नाही? तर आई मधु चोप्रा म्हणाल्या की, लग्न चांगले झाले आणि प्रियंका काम करत होती त्यामुळे ती येऊ शकली नाही. त्यानंतर तिने गिफ्ट म्हणून काय दिले असे विचारले असता मधु म्हणाली की काहीच नाही. देवाण-घेवाण नाही. लग्नात खूप मजा केली. यानंतर एका पॅप्सने जेव्हा परिणिती लग्नाच्या पोशाखात कशी दिसत होती असे विचारले तेव्हा मधु म्हणाल्या, 'ती तशी सुंदर आहे आणि छान दिसत होती.'

परिणीती चोप्राच्या लग्नाचे फोटोहा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक मधु चोप्राचे कौतुक करत आहेत. त्याचवेळी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. खुद्द अभिनेत्रीने ते इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एकमेकाशिवाय जगू शकत नाही... आमचा कायमचा प्रवास आता सुरू होतोय.' यावर प्रियांका चोप्रानेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले, माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.

टॅग्स :परिणीती चोप्राप्रियंका चोप्रा