मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर या अजब गजब कपलची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. २५ वर्षांचा फरक असूनही या कपलची केमिस्ट्री खूप स्ट्राँग आहे. तसेच हे दोघे नेहमीच त्यांचे रोमांटीक फोटोही सोशल मीडियावर शेअर करत रसिकांची वाहवा मिळवत असतात. मात्र यावेळी फक्त मिलिंदने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सा-यांचेच लक्ष वेधले आहे. मिलिंदने शेअर केलेला हा फोटो थोडा खासच आहे. कारण त्याने चक्क न्यूड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच हजारोंच्या संख्येने त्याला लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये पत्नी अंकिताने दिलेली कमेंट वाचून सा-यांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
१९९१ साली मिलिंदचे हे फोटोशूट खूप गाजले होते. यावर अनेक वादही झाले, त्यामुळे मिलिंदचा हा फोटो आजही रसिक विसरलेले नाहीत. मिलिंदने 1991 सालचा हा फोटो असल्याचे म्हणत शेअर केला आणि त्यावर ''म्हणूनच तेव्हा मी या जगात आले…हॅलो लव्हर'' अशी प्रतिक्रीया त्याच्या पत्नीने दिली आहे. अंकिताने दिलेली ही भन्नाट प्रतिक्रीया वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला असावा.
अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. मात्र दीड वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मिलिंद आणि अंकिता लग्नबंधनात अडकले. अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.