Join us

बायको अशी हव्वी..! जॅकी श्रॉफची पत्नी आयशाने गुंडाची धुलाई करून वाचवले होते अभिनेत्याचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 17:53 IST

अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी नुकतेच 'डान्स दीवाने ३'च्या सेटवर हजेरी लावली होती.

बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी नुकतीच डान्स दीवाने ३च्या सेटवर हजेरी लावली होती. ते आपला मित्र आणि अभिनेता सुनील शेट्टीसोबत गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. या शोचे सूत्रसंचालक राघव जुयाल यांनी दोघांनी प्रश्न विचारला होता की, ते आपापल्या पत्नींना घाबरतात का? त्यावेळी दोघांनी हो लिहिलेले पोस्टर उचलले. जॅकी श्रॉफ यांनी सांगितले की, आयशाने कशापद्धतीने त्यांच्यासोबत गुंडांची धुलाई केली होती.

जॅकी श्रॉफ यांनी सांगितले की, ‘माझे नाव फक्त भिडू आहे. मी आयशाला नेहमी घाबरतो. आजच नाही तर पहिल्यापासूनच. ती माझ्यासमोर रस्त्यावर गुडांना मारहाण करत होती. तेही मित्रांसाठी. माझे आणि एका मित्राचे भांडण झाले होते. तेव्हा तिथे काही गुंडे आम्हाला मारण्यासाठी आले. तेव्हा तिने माझ्यासमोर त्या गुडांना मारले. तेव्हापासून मी तिला घाबरतो.

आयशा आणि जॅकी श्रॉफ यांची ओळख आयशा १३ वर्षांच्या असताना झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मग त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. १९८७ साली त्यांनी लग्न केले.

आयशा आणि जॅकी श्रॉफ यांना दोन मुले आहेत टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ. टायगर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. तर कृष्णा बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

टॅग्स :जॅकी श्रॉफटायगर श्रॉफकृष्णा श्रॉफ