१मेच्या शुभमुहूर्तावर मराठी सिनेमा इंडस्ट्रीत ‘१०६ हुतात्मा चौक - संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल इनामदार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, लवकरच त्याच्या शूटिंगचा प्रारंभ होईल. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी ‘१०६ हुतात्मा चौक’ या महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटाची घोषणा केली. तसेच ‘१०६ हुतात्मा चौक’बद्दल दिग्दर्शक विशाल इनामदार म्हणाले की, लहानपणापासून ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ हे शब्द कानावर पडायचे, पण त्याविषयी कुणाकडून प्रमाणित माहिती कधीही मिळाली नाही. राज्यकर्त्यांना जो इतिहास गैरसोयीचा वाटतो तो तुमच्यापर्यंत ते पोहोचू देत नाहीत. हुतात्मा चौक म्हणजे काय असं विचारलं, तर '८३, ८४ बसचा शेवटचा स्टॉप' असं उत्तर आलं की तळपायाची आग मस्तकाला जायची. तेव्हा वाटलं की हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचायला हवा आणि त्यातूनच जन्माला आली संकल्पना ‘१०६ हुतात्मा चौक’ या चित्रपटाची. मोठे बजेट लाभलेल्या या ऐतिहासिक सिनेमाची कथा- पटकथा, संगीत, कपडेपट आणि दिग्दर्शनावर मेहनत घेतली जाणार आहे.
जिवंत होणार १०६ हुतात्मा चौक
By admin | Published: May 06, 2016 1:35 AM