छोट्या पडद्यावरील हलकीफुलकी विनोदी मालिका 'जिजाजी छत पर हैं'ने अल्पावधीतच सा-यांची मनं जिकंली आहेत.मालिकेत सर्वच भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या. प्रत्येक एपिसोडला मालिका नवीन वळण आणत रसिकांना हसून हसून लोटपोट करते. त्यामुळे मालिका सुपरहिट ठरते आहे.
मालिकेने नुकतेच ईलायची (हिबा नवाब) आणि पंचम (निखिल खुराणा) यांच्या बहुप्रतिक्षित गुपचूप करण्यात आलेल्या विवाहासह प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. या जोडप्याला ईलायचीचे वडिल मुरारीपासून (अनुप उपाध्याय) त्यांचा विवाह लपवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच ते नवविवाहित जोडप्याप्रमाणे त्यांचा 'पहिला' अनुभव देखील घेत आहेत. या जोडीला नुकतेच त्यांचे विवाह प्रमाणपत्र मिळाले, जे मुरारीपासून लांब सुरक्षितपणे लपवून ठेवणे गरजेचे आहे. दुसरीकडे शहरामध्ये उंदरांचा उपद्रव निर्माण झाला आहे.
मुरारी त्याच्या बेडवर उंदीर सापडल्यामुळे घाबरून जातो. त्याला होऊ शकणा-या नुकसानाबाबत भिती वाटू लागते. तो उंदरांचा त्रास दूर करण्यासाठी घरातील सामान दुसरीकडे हलवून साफसफाई करण्याच्या तयारीत असतो. मुरारी व करूणा ईलायचीचे कपाट रिकामे करत साफसफाई सुरू करतात. या कपाटातच विवाह प्रमाणपत्र लपवलेले असते. पंचम त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि ईलायची अगदी योग्य वेळी तिथे येऊन सत्य उघडकीस येण्यापासून वाचवते. विवाह प्रमाणपत्र लपवून ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये ईलायची ते प्रमाणपत्र मुरारीच्या बेडखाली लपवून ठेवते. ईलायचीला माहित नसते की, मुरारी त्यानंतर स्वत:च्या बेडची साफसफाई करणार आहे.
मुरारीला पंचम व ईलायचीचे विवाह प्रमाणपत्र मिळेल का?
ईलायचीची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्हणाली, ''प्रेक्षकांना आगामी एपिसोड्समध्ये अचंबित करणारे ट्विस्ट्स पाहायला मिळणार आहेत. पंचम व ईलायची त्यांच्या रोमँटीक क्षणांचा आनंद घेत आहेत आणि त्यासोबतच त्यांना त्यांचे वैवाहिक नाते गुपचूप ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मी मालिकेची पटकथा आणि या लपंडाव करावा लागणा-या क्षणांचा खूप आनंद घेत आहे.'' पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा म्हणाला, ''पंचम व ईलायची मुरारीपासून विवाह प्रमाणपत्र लपवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.