Join us

जगभरात विल स्मिथची चर्चा अन् तो मुंबईत दिसला, ३ दिवस ISKCON मध्ये राहिला आणि गेला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 2:36 PM

Will Smith : जगभरात विल स्मिथबाबत चर्चा होता आहे आणि तो मुंबईत (Mumbai) आला होता. विल स्मिथ २३ एप्रिलला मुंबईच्या कलीना एअरपोर्टवर दिसला.

ऑस्कर २०२२ (Oscar 2022) मध्ये कॉमेडियन क्रिस रॉकला कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथ (Will Smith) मीडियाच्या नजरेपासून गायब होता. जगभरात विल स्मिथबाबत चर्चा होता आहे आणि तो मुंबईत (Mumbai) आला होता. विल स्मिथ २३ एप्रिलला मुंबईच्या कलीना एअरपोर्टवर दिसला. विल स्मिथ या प्रायव्हेट एअरपोर्टवरून यूएसला परत जाताना दिसला.

असं सांगितलं जात आहे की, विल स्मिथसोबत एअरपोर्टवर इस्कॉनशी संबंधित धर्मगुरूही दिसले. असं समजतं की, विल स्मिथ महाराष्ट्राच्या वाडा येथील श्री श्री राधा वृंदावनबिहारी आश्रमात होता. विल इथे तीन दिवस होता. विल स्मिथ फारच आध्यात्मिक व्यक्ती आहे. याआधीही तो भारतात आला होता. त्यावेळी तो सदगुरूंना भेटला होता. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विल स्मिथ गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या जुहूमधील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये थांबला होता. आज विल एअरपोर्टवर गळ्यात माळ घातलेला दिसला. तो व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक शॉर्ट्समध्ये होता. एअरपोर्टवर विलसोबत काही लोकांनी फोटोही काढले. फोटोग्राफर्सकडे बघून त्याने हातही दाखवला.

पत्नीपासून घेतोय घटस्फोट?

दरम्यान, हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीची खिल्ली उडवली गेल्याने अभिनेता विल स्मिथने (Will Smith) होस्ट क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. आता बातमी अशी समोर येत आहे की, या प्रकारामुळे विल स्मिथच्या पर्सनल लाइफमध्ये मोठं संकट आलं आहे.

आता अशी जोरदार चर्चा होऊ लागली आहे की, विल आणि त्याची पत्नी जेडा (Jada Pinkett-Smith) यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. हॉलिवूडमध्ये कपलच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. द न्यूज इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, विल स्मिथ आणि जेडा पिंकेट स्मिथ हे आता मोठ्या मुश्कीलीने एकमेकांशी बोलतात. ते एकमेकांसोबत बोलणं टाळतात. असंही सांगितलं जात आहे की, दोघांमधील तणाव जास्त वाढला असून प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. 

टॅग्स :हॉलिवूडसेलिब्रिटी