तेनाली रामा ही सर्वात लोकप्रिय गोष्ट आहे आणि येत्या काही भागांमध्ये ती अधिक मनोरंजक होणार आहे. सोनी सबवरच्या तेनाली रामात लक्ष्मी देवी अवतरणार आहे.
येत्या भागामध्ये लक्ष्मी माता (रिशिना कंधारी) रामाच्या स्वप्नात येणार आहे आणि तिच्या वास्तव्याबद्दल ती रामाला माहिती देणार आहे. रामा (कृष्णा भारद्वाज) याकडे एक स्वप्न म्हणून दुर्लक्ष करतो आणि पुन्हा गाढ झोपी जातो. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी माता एका लहान मुलीच्या रूपात येते आणि रामाला नवरात्रातील पूजेच्या परंपरेबद्दल सांगू लागते. रामा स्वतः नऊ दिवस पूजा करत असतो. नवरात्रात शेवटच्या दिवशी देवी लक्ष्मी विजयनगर सोडून चालल्याचे रामाला कळते आणि तो देवीला थांबवण्याचा खूप प्रयत्व करतो. देवी विजयनगराच्या तटावर असतानाच रामा मातेला त्याच्याबरोबर शेवटचे भोजन घेण्यास सांगतो. विहिरीतून पाणी काढून आणण्याचा बहाणा करून, रामा मातेला विनंती करतो, की तो विहिरीतून पाणी काढून आणत नाही तोवर माता तिथेच राहील. लक्ष्मी देवीसुद्धा त्याचे म्हणणे मान्य करते. लक्ष्मी देवी विजयनगरमध्येच कायमची राहावी म्हणून रामा विहिरीपाशी जातो आणि आत्महत्या करतो. रामाच्या आताताई कृत्यामुळे देवी लक्ष्मी विजयनगर सोडून जाईल का? रामा खरोखर स्वतःचा जीव गमवेल का?
मालिकेतल्या या मनोरंजक भागाविषयी आणि आपल्या भूमिकेविषयी रिशिना कंधारी बोलत होत्या, त्या म्हणाल्या की, ''सोनी सबवरच्या तेनाली रामा या मालिकेत मी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सहभागी आहे. लक्ष्मी देवीची भूमिका साकारायला मिळणे, देवीमातेसारखी वेशभूषा करायला मिळणे ही फारच छान गोष्ट आहे. तसेच या भागासाठी मला देवीचे नऊ अवतार साकारता आले आणि तेही नवरात्र सुरू असताना, सगळ्याच कलाकारांना ही संधी प्राप्त होत नाही. मला देवीचा आशीर्वाद लाभला आहे आणि तेनाली रामासह अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी देवीने माझी निवड केली आहे असंच मला वाटत होतं. विजनगर सोडून जाण्याची देवीची इच्छा आणि मातेला थांबवण्याचा रामाचा आटोकाट प्रयत्न याचीच ही गोष्ट आहे.’’ या मालिकेत रामाची भूमिका करणारे कृष्णा भारद्वाज म्हणाले की, ''अतृप्त राहिल्यामुळे देवी मातेला विजयनगर सोडून जायचे आहे आणि रामा देवीचे मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे, असा हा भाग आहे. हा भाग अतिशय मनोरंजक झालेला आहे, प्रेक्षकांना तो नक्कीच खिळवून ठेवणार आहे.''