Join us

'हीरामंडी' वेब सीरिजचा दुसरा सीझन येणार का? जाणून घ्या काय म्हणाली मनीषा कोईराला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 9:33 AM

'हीरामंडी' ही सीरिज अखेर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाली आहे.

बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पहिल्यांदाच वेब सीरिज घेऊन आले आहेत. त्यांची 'हीरामंडी' ही सीरिज अखेर  प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. ही सीरिज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होताच, सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आली आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख आणि रिचा चढ्ढा यांच्या भूमिका आहेत.

मनीषा कोईराला हिनं एका मुलाखतमध्ये संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. इतकंच नाही तर मनीषानं  'हिरामंडी'चे आणखी अनेक सीझन येण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले. शिवाय यापुर्वी कधीच 'मल्लिका जान'सारखे पात्र साकारलं नसल्याचं तिनं सांगितलं. या भुमिकेशी जुळवून घेणं एक आव्हान असल्याचही ती म्हणाली. 

अभिनेत्री म्हणाली, "हिरामंडीमध्ये फक्त एक नाही तर अनेक कथा आहेत. या मालिकेचे आणखी बरेच सीझन बनवता येतील". मनीषा कोईरालाने तिच्या 'मल्लिका जान' या व्यक्तिरेखेबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, "माझ्या व्यक्तिरेखेत अनेक छटा आहेत, जिथे आईसारख्या भावना तिच्या मनात उमटतात, तर दुसरीकडे  नकारात्मक भावनाही आहेत".

28 वर्षांच्या दिर्घ काळानंतर संजय लीला भन्साळी आणि मनीषा कोईराला यांनी एकत्र काम केलं आहे. संजय लीला भन्साळी हे सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्याच्या चित्रपटातील प्रत्येक दृश्यात कलेचा उत्कृष्ट नमुना पहायला मिळतो. त्यामुळे ‘हिरामंडी’मध्येही त्यांच्या कामाची एक वेगळी बाजू पहायला मिळेल, यात काही शंका नाही. भन्साळींच्या दिग्दर्शनासाठी ही सीरिज आवर्जून पहायला हवी. 

टॅग्स :मनिषा कोईरालासेलिब्रिटीबॉलिवूडनेटफ्लिक्स