Join us

आता अशी दिसते 'परदेस' फेम महिमा चौधरी, बघा ओळखू शकाल तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 12:09 IST

अभिनेत्री महिमा चौधरीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती तेव्हा तिच्या लोभस सुंदरतेने प्रेक्षक तिचे चाहते झाले होते. आता ती सिने इंडस्ट्रीत नसली तरी आजही तिच्या भूमिका तिच्या चाहत्यांना आठवतात.

मुंबई : अभिनेत्री महिमा चौधरीनेबॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती तेव्हा तिच्या लोभस सुंदरतेने प्रेक्षक तिचे चाहते झाले होते. आता ती सिने इंडस्ट्रीत नसली तरी आजही तिच्या भूमिका तिच्या चाहत्यांना आठवतात. सध्या तिचा एक फोटो चांगलाच चर्चेत आला असून तिच्या चाहत्यांना हा फोटो तिचा आहे यावर विश्वासही बसत नाहीये. 

महिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला असून यात ती फार बदललेली दिसत आहे. स्लिम आणि हॉट फिगर असलेली महिमा आज फार बदलली आहे. आता ती फारच जाड झाली आहे. ऋतु चौधरी म्हणजेच महिमा चौधरीने सुभाष घई यांच्या 'परदेस' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यात ती शाहरुख खानसोबत दिसली होती. पण आताचा तिचा अवतार पाहून तिच्या चाहत्यांना धक्काच बसणार आहे. 

'परदेस' मध्ये शाहरुख खानसारखा मोठा स्टार असूनही महिमाने या सिनेमातून आपली वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली होती. पहिल्या हिट सिनेमानंतर महिमाला सिनेमे तर मिळाले पण जवळपास सगळेच सिनेमे फ्लॉप ठरले. त्यात दाग आणि धडकनमधील भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण हळूहळू ती इंडस्ट्रीतून गायब झाली. २००६ नंतर तर तिला छोट्या भूमिकाही मिळणं बंद झालं. 

एका मुलाखतीत महिमा म्हणाली होती की, 'मला जीवनातील बेस्ट रोल प्ले करायचा होता, म्हणून मी सिनेमापासून दूर गेले. हा रोल एका आईचा होता, हा रोल रील आणि रिअल होता. माझी मुलगी अऱियानाने माझं जीवन बदललं'.  

टॅग्स :महिमा चौधरीबॉलिवूडसेलिब्रिटी