Join us  

सेक्स एन्जॉय केल्यास महिला वेश्या ठरत नाहीत - रणदीप हुड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 10:43 PM

हायवे, रंग रसिया, किक, जिस्म-२, सुलतान सारख्या अनेक चित्रपटात दमदार कामगिरी करणारा अभिनेता रणदीप हुड्डाने महिलाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात अडकला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - हायवे, रंग रसिया, किक, जिस्म-२, सुलतान सारख्या अनेक चित्रपटात दमदार कामगिरी करणारा अभिनेता रणदीप हुड्डाने महिलाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात अडकला आहे.  एखादी महिला सेक्स एन्जॉय करीत असेल तर तिला आपण वेश्या म्हणू शकत नाही असे विदान एका इव्हेंटमध्ये रणदीपने केले आहे. एमटीव्हीवरील बिग ऑफ सीझन-२मधून रणदीप छोट्या पडद्यावर डेब्यू करत आहे. या शोच्या प्रमोशन साठी एका इव्हेंटमध्ये गेला असता त्याने हे वादग्रस्त वक्तव्या केले आहे. 
 
छोट्या पडद्यावर दणक्यात आगमन करण्यासाठी सध्या रणदीप अनेक इव्हेंट, रियालटीमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. बिग ऑफ सीझन-२ विषयी बोलताना तो म्हणाला की, महिला या पुरुषांच्या डिझायर नाहीत, तर त्या मानव म्हणून या पृथ्वीवर जन्मास आल्या आहेत. त्यामुळे एखादी महिला सेक्स एन्जॉय करीत असेल तर तिला आपण वेश्या म्हणू शकत नाही
 
पुढे बोलताना रणदीप म्हणाला की, एखादी महिला सेक्स एन्जॉय करत असेल किंवा एखादी मुलगी कोण्या मुलाबरोबर फिरायला जात असेल तर याचा अर्थ ती कॅरेक्टर लेस आहे असा होत नाही. कारण कुठलीही महिला अथवा मुलगी अगोदर मानव आहे. जर एखादी मुलगी एखाद्यास नाही म्हणत असेल तर याचा अर्थ क्लिअर नाही असा आहे. आपण त्या महिलेच्या भावनांची कदर करायला हवी. 
 
वास्तविक हा शो भारतीय महिलांच्या मानसिकतेवर आधारित आहे. ज्यामध्ये त्या महिला त्यांच्या हिडन डिझायरला लपविण्याचा प्रयत्न करीत असतात. रणदीपने सांगितले की, मी या शोमध्ये अशाच पुरुषांना अ‍ॅड्रेस करणार जे महिलांना केवळ ऑब्जेक्ट समजत असून, महिलांना अशाच प्रकारे ट्रीट करायला हवे अशी भावना ठेवतात. 
 
रणदीपने म्हटले की, आपण 2017 मध्ये वावरत आहोत; मात्र महिलांच्या सेक्स्युअल डिझायर आणि फँटेसी विषयी बोलण्यास आजही आपल्या सोसायटीमध्ये टॅबू मानले जाते. या शोच्या माध्यमातून आम्ही याचा विषयावर प्रकाशझोत टाकणार असून, देशातील त्या तमाम, स्त्री-पुरुषांना आम्ही सांगणार की, तुम्हाला तुमचे विचार शेअर करण्याचे स्वातंत्र्य आहे.