Join us

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला पाहताच महिला आपल्या पतीला ठेवायच्या लपवून, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:16 IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने चार दशकांच्या कारकिर्दीत जास्त नकारात्मक भूमिका केल्या आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायिका बिंदू (Actress Bindu) राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या बऱ्याच हिट सिनेमात झळकल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नायिकांना टक्कर दिली. चित्रपटांमध्ये त्या अनेकदा मुख्य नायकांना आकर्षित करताना दिसल्या. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये प्रेम चोप्रा यांची नायिका म्हणून काम केले आहे.

बिंदू यांनी त्यांच्या चार दशकांच्या कारकिर्दीत जास्त नकारात्मक भूमिका केल्या आहेत. मात्र त्या नायिका बनण्याचे स्वप्न घेऊन सिनेइंडस्ट्रीत आल्या. पण त्यांना खलनायिका बनवले. असंख्य चित्रपटांमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारल्याबद्दल त्यांनी प्रशंसा मिळवली. ज्या काळात अभिनेत्री लग्नाचा विचार करायलाही संकोच करत होत्या, त्या काळात बिंदू यांनी लग्नानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. बिंदू राजेश खन्ना यांच्या १९७१ साली रिलीज झालेल्या कटी पतंग या चित्रपटातही झळकल्या होत्या. या चित्रपटात त्या प्रेम चोप्रा यांच्या नायिकेच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटातही त्यांनी खलनायिकेची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्या निर्मात्यांची पहिली पसंती बनल्या होत्या. आजही लोक खलनायिका बिंदू यांना विसरलेले नाहीत ज्या झगमगते कपडे घालायच्या, कॅबरे डान्स करायच्या आणि खलनायकासोबत खांद्याला खांदा लावून चालायच्या.

अभिनेत्रीला पाहिल्यानंतर महिला त्यांच्या पतींना लपवत असतबिंदू यांनी त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले की, चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या ग्रे शेड भूमिकांमुळे त्यांना खऱ्या आयुष्यात खूप समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. लोक त्यांना शिवीगाळ करायचे आणि महिला त्यांच्यापासून आपल्या पतींना लपवायच्या, कारण त्या त्यांच्या पतींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील, असे त्यांना वाटत असे. 

शेजाऱ्यासोबत अभिनेत्रीने घेतले सात फेरेबॉलिवूडची 'मोना डार्लिंग'ने तिच्या लग्नाची बातमी जगापासून आणि इंडस्ट्रीपासून वर्षानुवर्षे लपवून ठेवली. अभिनय जगात प्रवेश करण्यापूर्वीच, वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी त्यांच्यापेक्षा ५ वर्षांनी मोठ्या असलेल्या शेजाऱ्याशी लग्न केले. त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ नये म्हणून अभिनेत्रीने हे वर्षानुवर्षे सीक्रेट ठेवले. 'कटी पतंग', 'दो रास्ते', 'बीवी हो तो ऐसी' यांसारख्या चित्रपटातून त्यांनी लोकप्रियता मिळवली. 

टॅग्स :बिंदू