Join us

मुक्ता बर्वेचा सत्य घटनांवर आधारित 'वाय' उद्यापासून रुपेरी पडद्यावर, लगेच तिकीट करा बुक...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 8:14 PM

Y Marathi Movie : ‘वाय’ हा एक थरारपट आहे. हायपरलिंक... हायपरलिंक...असं सारखं म्हटलं जातंय. साध्या भाषेत याचा अर्थ सांगायचा झाल्यास एका टाईमलाईनमध्ये, एकाच वेळेत अनेक ठिकाणी घडलेले प्रसंग शेवटी एका गोष्टीला येऊन मिळतात.

Y Marathi Movie : अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या (Mukta Barve) ‘वाय’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित हा सिनेमा शुक्रवारी म्हणजेच उद्या म्हणजेच 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘Y’चं उत्कंठावर्धक प्रमोशन, त्याचे थरारक टीझर आणि दमदार ट्रेलर पाहून या चित्रपटाबद्दलचं कुतूहल वाढलं आहे. मुक्तासोबत प्राजक्ता माळी, संदीप पाठक, नंदू माधव, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले आदी कलाकार या सिनेमात आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आशुतोष म्हणजे ही भूमिका साकारणारा अभिनेता ओमकार गोवर्धनही (Omkar Govardhan) या चित्रपटात आहे. या सिनेमाची तिकिट्स खाली दिलेल्या लिंकवर बुक करता येणार आहेत. 

काय आहे नेमका ‘Y’?

‘वाय’ हा एक थरारपट आहे. हायपरलिंक... हायपरलिंक...असं सारखं म्हटलं जातंय. साध्या भाषेत याचा अर्थ सांगायचा झाल्यास एका टाईमलाईनमध्ये, एकाच वेळेत अनेक ठिकाणी घडलेले प्रसंग शेवटी एका गोष्टीला येऊन मिळतात. अनेक नद्या एकत्र येऊन समुद्र तयार होतो. तसा हा हायपरलिंक सिनेमा असणार आहे. यासाठी खूप तगडा स्क्रीनप्ले असण्याची गरज असते आणि जो आमच्या लेखक टीम आणि दिग्दर्शकाने चांगलाच बांधलाय. ज्याच्या मी प्रेमात पडले आणि सिनेमा करायला घेतला, असं मुक्ताने यावेळी सांगितलं.

Y सिनेमाचे तिकीट बुक करण्यासाठी इथे क्लिक करा.

‘वाय’ चे दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘’ ही एक वास्तववादी कथा आहे. आपल्या आजुबाजुला अशा अनेक घटना घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. ‘वाय’ च्या निमित्ताने हे भयाण वास्तव प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘वाय’ बघून प्रेक्षक अंतर्मुख होऊन नक्कीच विचार करायला लागतील, अशी आशा व्यक्त करतो.’’ पटकथा व संवाद अजित वाडीकर , स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.

हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या पोस्टरपासूनच खरंतर या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मुक्ता बर्वे या चित्रपटात एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटनांचा शोध मुक्ता यात घेताना दिसलीये.

All that you would like to explore and know about the movie Y (Marathi) - (Marathi) 

https://in.bookmyshow.com/pune/movies/y-marathi-marathi/ET00330039 @Bookmyshow

टॅग्स :मुक्ता बर्वेप्राजक्ता माळी