बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम तिच्या आगामी 'आर्टिकल ३७०' या सिनेमामुळे चर्चेत आहे. २०१८ साली काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं होतं. यावरच आधारित यामीचा 'आर्टिकल ३७०' हा सिनेमा आहे. या सिनेमात यामी एका दमदार एनआयए ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
'आर्टिकल ३७०' सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवातच काश्मीर नयनरम्यक दृश्यापासून करण्यात आली आहे. सुरुवातीला यामी म्हणते, "काश्मीर इज लॉस्ट केस...जोपर्यंत हे स्पेशल राज्य आहे आपण त्याला हातही लावू शकत नाही." २.४३ मिनिटांचा 'आर्टिकल ३७०' सिनेमाचा या ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. या सिनेमातून काश्मीरमधून 'आर्टिकल ३७०' हटवण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीपासून ते कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये काय परिस्थिती होती, हे दाखविण्यात येणार आहे. ट्रेलरमध्ये ह्याची झलक दिसत आहे.
यामी गौतम मुख्य भूमिकेत असलेल्या 'आर्टिकल ३७०' सिनेमाची निर्मिती आदित्य थार आणि लोकेश थार यांनी केली आहे. यामीबरोबर या सिनेमात प्रिया मणि, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल यांच्या मुख्य भूमिका आहेत. अरुण गोविल या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत आहेत. मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादीही झळकला आहे. हा सिनेमा २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.