यामी गौतमचा नेहमीच ट्रेडिशन असो किंवा आणि मॉर्डन प्रत्येक अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. यामीचे सोशल मीडियावर पारंपरिक अंदाजातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत तिने साडी लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली असून कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे. यामी पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले होते.
याचवर्षी लग्नाच्या बंधनात अडकलेली यामी गौतमने पती आदित्य धरसोबत तिचा पहिला करवा चौथ साजरा केला, त्यादरम्यान दोघेही खूप क्यूट दिसत होते. पती आदित्यसाठी यामीने उपवास केला होता. सकाळपासून ते रात्रीपर्यंत जोपर्यंत चंद्र दिसत नाही. तोपर्यंत तिने काहीही न खाता उपवास करत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी यामीच्या लूकने तर चाहत्यांची वाहवा तर मिळवलीच पण या सगळ्यात तिच्या सोन्याचे मंगळसूत्रानेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.यामीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या फोटोंना समर्पक अशी कॅप्शनही दिली होती, "माझा पहिला करवाचौथ साजरा करण्याचा आनंद हा वेगळाच आहे आणि मी @bulgari मंगळसूत्र (sic) घातल्यामुळे तो आणखी खास झाला आहे." Bvlgari मंगळसूत्राची मूळ किंमत ₹3,49,000 इतकी आहे.मंगळसूत्राचे डिझाइनही हटके असून सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
मंगळसूत्र हा नेहमीच सगळ्यांंसाठी कुतूहलाचा विषय असतो. अगदी शिल्पा शेट्टी, बिपाशा बासू यांच्या मंगळसूत्रापासून ते दीपिका पादुकोणच्या महाग मंगळसूत्रापर्यंत सर्वांनाच कुतूहल वाटते. विशिष्ट डिझाईन असलेल्या मंगळसूत्राची नेहमीच चर्चा असते. अगदी त्याचप्रमाणे यामीच्या हटके मंगळसूत्रानेही रसिकांची चांगलीच पसंती मिळवली असल्याचे पाहायला मिळत आहे.