Join us

Throwback : ‘सिलसिला’च्या सेटवरचा एक किस्सा, यश चोप्रांची विनंती अन् रेखानं शोधलेला पर्याय...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 8:00 AM

Silsila : ‘सिलसिला’ या चित्रपटासाठी रेखा, जया व अमिताभ यांना राजी करणं दिग्दर्शक यश चोप्रांसाठी सोप काम नव्हतं. मनातून तेही घाबरले होते. कारण मामला कुठल्याही क्षणी बिघडू शकला असता...

बॉलिवूडच्या आयकॉनिक चित्रपटांच्या यादीत एका चित्रपटाचा उल्लेख करावाच लागेल. तो म्हणजे ‘सिलसिला’. ‘सिलसिला’ (Silsila)हा चित्रपट आजही त्याच्या स्टारकास्टसाठी आठवला जातो. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan),जया बच्चन (Jaya Bachchan) आणि सोबत रेखा (Rekha). ‘सिलसिला’ या चित्रपटाचं हे त्रिकुट एकत्र काम करणार म्हटल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. जया बच्चन या चित्रपटासाठी राजी झाल्याच कशा? हा एक प्रश्न तर सर्वांनाच पडला होता. 70 च्या दशकात अमिताभ व रेखा यांच्या अफेअरच्या चर्चेने जया यांना चिंतेत टाकलं होतं. काहीअर्थी हीच कथा ‘सिलसिला’च्या रूपात दाखवली जाणार होती. साहजिकच या चित्रपटासाठी रेखा, जया व अमिताभ यांना राजी करणं दिग्दर्शक यश चोप्रांसाठी एवढं सोप काम नव्हतं. मनातून तेही घाबरले होते. कारण मामला कुठल्याही क्षणी बिघडू शकला असता. त्यामुळे यश चाेप्रा अतिशय सावध होते. सिनेमाच्या सेटवर ना मित्रमंडळींना एन्ट्री होती, ना मीडियाला.

लेखक यासीर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात ‘सिलसिला’च्या सेटवरचे अनेक किस्से लििहले आहेत. सिनेमात जया अमिताभच्या पत्नीच्या भूमिकेत होत्या, तर रेखा त्यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत. रिअल लाईफमध्येही समांतर स्टोरी सुरू होती. त्यामुळे यश चोप्रा दचकून होते. कुठल्याक्षणी सेटवरचा माहौल खराब होईल, याची खात्री नव्हती. 

यश चोप्रांनी केली होती विनंती...यासीर उस्मान यांच्या पुस्तकात यश चोप्रा यांच्या एका मुलाखतीचा उल्लेख आहे. त्यानुसार, शूटींग सुरू होण्याआधी यश चोप्रा जया व रेखा यांना वेगवेगळे भेटले होते. तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात, माझ्या सेटवर कृपा करून काहीही गोंधळ होऊ देऊ नका, अशी विनंती त्यांनी केली होती. यावर रेखा व जया दोघींनीही आपल्यामुळे काहीही होणार नाही, अशी खात्री यशजींना दिली होती.असं म्हणतात की, रेखा जयांचा सामना करू इच्छित नव्हत्या. त्यामुळे जया सेटवर आल्या की रेखा निघून जायच्या. जया गेल्या की रेखा यायच्या. अमिताभ, रेखा व जया तिघांचा एकत्र सीन असल्यावर जणू आम्ही तिघंही एकमेकांना ओळखतच नाही, असा त्यांचा वावर असायचा. अर्थात पडद्यावर आपआपसातील हे मतभेद त्यांनी जराही जाणवू दिले नाहीत.

 जया यांनी ठेवली होती ही अट...असं म्हणतात की, सुरूवातीला जया यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. पण यश चोप्रांनी हार मानली नाही. अखेर जया एका अटीवर ‘सिलसिला’मध्ये काम करण्यास राजी झाल्या. होय, चित्रपटाची हॅपी एंडिंग होणार असेल तरच मी या चित्रपटात काम करेल, असं जया यांनी स्पष्ट सांगितलं. सरतेशेवटी अमिताभला जयाजवळच परतावं लागेल, हीच त्यांची अट होती. यश चोप्रा यांनी जया यांची ही अट मान्य केली आणि जयांनी ‘सिलसिला’ साईन केला.

टॅग्स :रेखाजया बच्चनअमिताभ बच्चनयश चोप्राबॉलिवूड