Join us

मदतीसाठी धावून आले राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा करणार इतक्या कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 2:57 PM

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.  

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मदतीचा हात पीएम केअर फंडला मदत केली. आता यशराज फिल्मसने देखील हिंदी चित्रपटसृष्टीतील रोजंदारी कामगारांना संरक्षणासाठी पुढे आली आहे.  सेटिंग्ज विभाग, कार्पेंटर्स, लायटिंग, ज्युनियर आर्टिस्ट, स्पॉट्स आदींचा अशा कामगारांचा समावेश आहे.  या कठीण काळात या कामगारांना उदरनिर्वाहासाठीची मूलभूत सामग्री पुरवली जावी आणि त्यांच्या कुटुंबांचीही काळजी घेतली जावी, यासाठी यशराज फिल्म्स प्रयत्नशील आहे. 

चित्रपट उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधाराची नितांत गरज असलेल्या चित्रपटसृष्टीतील हजारो रोजंदारी कामगारांना मदत पुरवण्यासाठी यशराज फिल्म्स कंबर कसली असून त्यांच्या बँक खात्यांचे तपशीलही गोळा केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात या सामाजिक स्तरापर्यंत मदत थेट आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने पोहोचावी यासाठी यश चोपडा फाऊंडेशन देणगीची रक्कम थेट या व्यक्तींच्या खात्यांमध्ये जमा करणार आहे.

चित्रपटउद्योगातील जास्तीत जास्त गरजू कामगारांना या कठीण आर्थिक परिस्थितीत आर्थिक साह्याचे संरक्षण पुरवण्यास वायआरएफ कटिबद्ध आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मदतीच्या पहिल्या टप्प्यात वायआरएफ या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना 1.5 कोटी रुपयांचे वाटप करणार आहे. 

टॅग्स :आदित्य चोप्रा राणी मुखर्जी